Bhokardan Assembly Constituency 2024 Sarkarnama
मराठवाडा

Bhokardan Assembly Constituency 2024 : मुलाखतीला `लेट` पण उमेदवारीच `थेट`, भोकरदनमध्ये दोन `दानवे` भिडणार!

In Bhokardan, only NCP, rejecting the claim of Congress, nominated Chandrakant Danve : भोकरदन विधानसभेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनाच उमेदवारी दिली. विधानसभेला दोन वेळेस पराभव होऊन देखील ही जागा राष्ट्रवादीलाच सोडण्यात आली.

Jagdish Pansare

तुषार पाटील

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी पुण्यात बोलावलेल्या बैठकीला `लेट` पोहचले होते. सकाळी अकरा वाजता बैठक होती, पण वाहतुक कोंडीत सापडल्याने आपल्याला जायला उशीर झाला, असे चंद्रकांत दानवे यांनी सांगितले होते. पण मुलाखतीला `लेट` पोहचलेल्या चंद्रकांत दानवे यांनी उमेदवारी मात्र `थेट` मिळवली. अर्ज दाखल करायला रोहित पवारांना आणत चंद्रकांत दानवे यांनी पक्षातील आपले वजन दाखवून दिले.

भोकरदन विधानसभेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनाच उमेदवारी दिली. (NCP) विधानसभेला दोन वेळेस पराभव होऊन देखील ही जागा राष्ट्रवादीलाच सोडण्यात आली. या जागेसाठी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोर लावला होता. मात्र उमेदवारीची माळ नशिबाने दानवेंच्याच गळ्यात पडली. चंद्रकांत दानवे यांना पक्षातून याही वेळेस मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यातच ऐन मुलाखतीला ते दोन तास लेट झाले.

अखेर टोपे व रोहित पवार यांच्या आशीर्वादाने चंद्रकांत दानवे `तुतारी` फुंकण्यात यशस्वी झाले. भोकरदन पॅटर्नच्या माध्यमातून राज्यभर प्रसिद्ध झालेले एकेकाळी अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत असणारे चंद्रकांत दानवे यांना रोहित पवारांच्या माध्यमातून यंदाच्या विधानसभेला जणू देवच पावला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी देण्यावरून पक्षातून विरोध झाला होता. मात्र अंकुशराव टोपे यांच्या निर्णयावर त्यांना उमेदवारी देण्यात आली व ते आमदार झाले.

अशीच परिस्थिती पंधरा वर्षानंतर यंदा निर्माण झाली. यावेळी राजेश टोपे यांनी चंद्रकांत दानवेच या मतदार संघासाठी योग्य आहेत, अशी भूमिका घेतली व रोहित पवार यांच्या मर्जीतून हे तिकीट देण्यात आल्याचे समजते. (Bhokardan) लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे व त्यांचे बंधू सुधाकर दानवे हे बारामती मतदारसंघात काही काळ प्रचारासाठी होते. (Jalna) त्यावेळेस त्यांचा रोहित पवार यांच्याशी जवळून संपर्क आला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर भोकरदन येथील मेळाव्यात झालेला `राडा` बघता दानवेंचे तिकीट कापले जाणार, असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. मात्र विधानसभेचे तिकीट आणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द रोहित पवारांना आणून दानवे यांनी पक्षातील व महाविकास आघाडीतील नेत्यांना आपले राजकीय वजन दाखवून दिल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.

चंद्रकांत दानवे नशीबवान..

काल झालेल्या दानवे यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन मतदारसंघात दानवे हे नशीब घेऊन आले आहेत, असा टोला लगावला. प्रत्येक वेळेस पक्षात व आघाडीत विरोध होऊन देखील अखेर ऐनवेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गरम तव्यावर पोळी भाजण्याची संधी ही चंद्रकांत दानवे यांनाच मिळते.

1990 पासून हा मतदारसंघ दानवे नावाभोवतीच फिरत आहे. आधी रावसाहेब दानवे नंतर चंद्रकांत दानवे, मग संतोष दानवे यांच्यामुळे भोकरदन आणि दानवे हे समीकरणच बनले आहे. एकूणच मुलाखतीला झालेला त्यांचा `लेट मार्क` इतर इच्छुकांच्या नाहीतर दानवेंच्याच पथ्यावर पडला, असे म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT