Jayant Patil-EX. MLA Vijay Bhamble Sarkarnama
मराठवाडा

NCP Leadaer Jayant Patil : विजयी उमेदवारात जिंतूरमधून भांबळे हवेच ; जयंत पाटलांकडून उमेदवारी फिक्स..

Jagdish Pansare

Marathwada NCP (SP) Political News : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा कोण कोणासोबत जातो? याची चर्चा आणि उत्सूकता सगळ्यांना लागली होती. मराठवाडा कायम शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. पक्ष फुटल्यानंतरही तो तसाच साहेबांच्या पाठीशी उभा आहे. परभणी जिल्ह्यात माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून येतील, त्या विजय भांबळे असलेच पाहिजेत, असे आवाहन (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. परभणी जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथे आयोजित मेळाव्यात जयंत पाटील यांनी एकप्रकारे विजय भांबळे यांची उमेदावारीच जाहीर केल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

आपला पक्ष फुटला तेव्हा जिंतूरचे नेते माजी आमदार विजय भांबळे यांनी आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तुमचा स्वाभिमान जपला. काहीजणांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला. सरकारला आता सर्वच जण लाडके वाटत आहेत. मुळात लाडकं असं काही नाही. तर लाडक्या खुर्चीसाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

आज काही मुठभर लोकच श्रीमंत होत आहेत. त्याच लोकांना सरकारचे टेंडर मिळतात. पण गरीब माणूस दिवसेंदिवस पिचला जात आहे, अशी टीका (Jayant Patil) जयंत पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली. आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यात विजय भांबळे आवर्जून असेल पाहिजेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

आता निवडणूक घ्यायला महायुती घाबरत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली आहे. कदाचित दिवाळीनंतर निवडणुका लागतील. जर असे झाले तर सरकार दिवाळी जोरात साजरी करेल. लोकसभेलाही खुप पैसा वाटला गेला होता. पण लोकांनी निकाल हा फुले ,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या बाजूनेच दिला. विधानसभेतही तेच चित्र दिसेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT