Sushma Andhare | Devendra Fadanvis
Sushma Andhare | Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Sushma Andhare News: श्रीकांत शिंदेंच कार्यालय कोणाच्या जागेत? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याच्या प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना थेट महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर काही गंभीर आरोप केले. या आरोपांना आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. (In whose premises is Shrikant Shinde's office? Sushma Andahan direct question to Fadnavis)

मुंबईच्या उल्हासनगरच्या गोल मैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी चेक केलं पाहिजे. ती जागा अनिल जयसिंघानीची आहे की नाही चेक करावी, चेक करायला काही हरकत आहे का, श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? असेल तर कसं?” असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

२०१५ साली अनिल जयसिंघानी या पठ्ठ्यानं तत्कालीन शिवसेनेत यायचं ठरवलं होतं. उल्हासनगरमध्ये राहणारा माणूस म्हणजे ठाणे जिल्ह्याचा हद्दीत राहणारा माणूस. हा माणूस मातोश्रीपर्यंत येतो. मग याच्यासाठी वेळ कोणी घेतली.एकनाथ शिंदे होते. पण हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एकनाथ शिंदे आणि अनिल जयसिंघानी यांचे संबंध काय आहेत?” असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, किरीट सोमय्यांनी शोध घ्यावा,असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. "ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले आहेत त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदेंच कार्यालय असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तसेच, जयसिंघानि यांची जवळीक कोणाची? याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT