Gurdian Minster Atul Save News, Jalna
Gurdian Minster Atul Save News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna : सजवलेल्या बैलगाडीतून नुकसानीची पाहणी, पालकमंत्री सावे यांचा दौरा वादात..

सरकारनामा ब्युरो

जालना : पालकमंत्री अतुल सावे यांचा दौरा वादात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणीसाठी जातांना सजवलेल्या बैलगाडीतून (Atul Save) सावे बांधावर गेल्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड उठत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांवर कायम संकट येत आहेत. (Jalna) आधी अतिवृष्टी, त्यानंतर सततचा, अवकाळी पाऊस आणि आता परतीच्या पावसाने (Farmers) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक आणि काढलेले वाहून गेल्याने शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे.

अशावेळी त्याला तातडीने मदतीचा हात देवून दिलासा देण्याची गरज असतांना मंत्र्यांकडून मात्र पाहणी दौऱ्याकडे देखील पर्यटन म्हणून पाहिले जाते की काय? असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पालकमंत्री म्हणून अतुल सावे या भागात नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करण्यासाठी गेले होते. चिखलाचा रस्ता असल्यामुळे सावे यांना बैलगाडीतून बांधापर्यंत नेण्यात आले.

परंतु हे करत असतांना बैलगाडी सजवण्यात आली होती. सजवलेल्या बैलगाडीतून सावेंनी बांधावर जाऊन पाहणी केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्याला सरकारकडून मदत मिळत नाहीये.

अशावेळी शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे असतांना सावे यांच्या या कृतीने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सजवलेल्या या बैलगाडीचे सारथ्य बदनापूरचे आमदार नारायण कूचे हे करत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT