Ashok Chavan-Balasaheb Thorat News, jalna Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : वाढदिवसाच्याच दिवशी थोरातांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा देणे दुर्दैवी..

Congress : पक्षासाठी मी आणि विश्वजीत कदम आम्ही दोघेही जे करावे लागेल ते करायला तयार आहोत.

सरकारनामा ब्युरो

Jalna : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील वादातून थोरातांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. काॅंग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देत थोरांतानी पक्षाला मोठा धक्का दिला. यावर जालना येथे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थितीत असलेल्या माजी मंत्री व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी थोरातांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, आज त्यांचा वाढदिवस असल्याने सकाळी दहाच्या सुमारास मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर मला आताच त्यांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा दिल्याची बातमी कळते आहे. (Congress) खरतर ही दुर्दैवी बाब आहे. थोरात हे शांत आणि संयमी नेते आहेत. गेली कित्येक वर्ष आम्ही दोघेसोबत पक्षाचे काम करतो आहे. त्यामुळे त्यांनी असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागे नेमंक काय कारण आहे? याची माहिती घेवूनच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.

महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील हे बाळासाहेब थोरांताची समजुत काढण्यासाठी दिल्लीहून निघाले आहेत का? या संदर्भात आपल्याला माहिती नाही, पण पक्षासाठी मी आणि विश्वजीत कदम आम्ही दोघेही जे करावे लागेल ते करायला तयार आहोत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि त्यात तांबे पिता-पुत्रांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद यातूनच थोरातांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते.

सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. त्यानंतर काॅंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे पत्र थोरातांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना कालच पाठवल्याचे बोलले जाते. त्यानंतर आज वाढदिवसाच्या दिवशीच थोरातांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT