Farmers Protest in Font Of Cm,Dcm News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Farmers Protest News : समृद्धीवरून सुसाट निघालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Farmers Protest : गाड्यांचा ताफा जामवाडी शिवारात पोहचला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेवून तिथे दाखल झाले.

उमेश वाघमारे

Farmers Protest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत केली. मर्सिडीजमध्ये सुसाट निघालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला मात्र सामोरे जावे लागले.

जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावरून जात असतांना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. (Devendra Fadanvis) राज्यात सध्या सर्वत्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई सुरू आहे. (Marathwada) या विरोधात व इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जालन्यातील जामवाडी शिवारात पोहचला तेव्हा शेतकरी अचानक काळे झेंडे घेवून तिथे दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत महावितरणकडून असलेल्या कारवाईचा निषेध केला.

समृध्दी महामार्गावर शेतकरी व किसान काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी हे आंदोलन केले. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असून हे प्रकार थांबवावेत. केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करावे.

शिवाय महापुरूषांबाबत बेताल व्यतव्य करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शेतकरी रतन शिंदे, असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, जिल्हा सचिव गौतम लांडगे आदींचा आंदोलनात सहभाग होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT