Raosaheb danve | CM Eknath Shinde |Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : "...याचे शिल्पकार तर मुख्यमंत्री शिंदे," तू-तू-मैं-मैं करत सत्तार अन् दानवे 'रेल्वेट्रॅक'वर

Akshay Sabale

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्रिमंडळानं जालना-जळगाव मार्गासाठी हिरवा कंदील दाखवून निधीची तरतूद केली आहे. यावरून आता शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपा आमने-सामने आले असून श्रेयवादाचं राजकारण रंगलं आहे.

या रेल्वेमार्गासाठी आपण पाठपुरावा केला, असं माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी म्हटलं होतं. तर, रेल्वेमार्गाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी केलेल्या दाव्यामुळे दोन्ही पक्षांतील कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. समीर काजी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन जालन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर उपस्थित होते.

तीन दिवसांपूर्वी रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा झाला होता. यानंतर आपल्या कार्यकाळात रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले, असं रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी म्हटलं होतं.

यानंतर शनिवारी अब्दुल सत्तार यांनी रेल्वे मार्गाचं श्रेय मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं. "जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार मुख्यमंत्री शिंदे आहे. मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमार्गासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले," असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला..

अब्दुल सत्तार अन् रावसाहेब दानवे वाद पुन्हा उफळणार?

गेली तीस-पसत्तीस वर्षापासून रावसाहेब दानवे आणि सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील मैत्री लोकसभेला तुटली. सत्तार यांनी उघडपणे दानवे यांच्याविरोधात काम करत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केल्याचं कबूल केलं.

यानंतर अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान बनले आहे. त्यांनी जमिनी हडपल्या, नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे, अशा आरोपांचा भडिमार करत दानवे यांनी केला होता. यातच रेल्वे मार्गामुळे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा तू-तू मैं-मैं रंगण्याची शक्यता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT