Jalna Lok Sabha 2024 Sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha 2024: जालन्याची जागा पुन्हा काँग्रेसच्या वाटेला; तिसऱ्यांदा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार...

सरकारनामा ब्यूरो

Jalna News: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा आज सुटला. तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत उमेदवार जाहीर केले आहेत. यात जालना लोकसभेची जागा (Jalna Lok Sabha Constituency 2024) ही पुन्हा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आली आहे.

त्यामुळे जालन्यात पुन्हा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सामना रंगणार आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली. तेव्हा कल्याण काळे यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. काळे हे दानवेंना कसे आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विकासाच्या मुद्द्यांवर दानवे ही लोकसभा लढणार असल्याचे उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी सांगितले आहे, तर काळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार याकडे लक्ष लागले आहे. या पूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते.

रावसाहेब दानवे यांनी १९९९ पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते. त्यानंतर उत्तमसिंग पवार, कल्याण काळे, विलास औताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले. जालना जिल्ह्यात १९९९ मध्ये सर्वाधिक ७२.४८ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये रावसाहेब दानवे ५७.७३ टक्के मतदान घेऊन निवडून आले होते.

जालना लोकसभेत १९९१ ची निवडणूक वगळता आठ वेळा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. १९८९ मध्ये पुंडलिक हरि दानवे, १९९६ व १९९८ च्या निवडणुकीमध्ये उत्तमसिंग पवार, यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांनी आपल्याकडे खेचून आणला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT