Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील लोकसभेच्या जालना मतदारसंघात (Jalna Constituency) महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसने माजी आमदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. काळे यांच्या उमेदवारीनंतर जालन्याची एकतर्फी वाटणारी लढत आता रंगतदार वळणावर पोहाेचली आहे.
सलग पाचव्यांदा निवडून आल्यामुळे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना अहंकार झाला असून, तो अहंकार जनता या निवडणुकीत संपवणार, असा हल्लाबोल काळे प्रचारातून करत आहेत, तर दुसरीकडे 2009 आणि 2024 ची तुलना करता येणार नाही. पंधरा वर्षांत देश बदलला, भाजप बदलला आणि जालना लोकसभा मतदारसंघातील चित्र बदलले. सर्वच क्षेत्रात चौफेर विकास झाल्यामुळे कोण काय बोलतं आणि टीका करतं याकडे मला लक्ष द्यायला वेळ नाही. Latest Update on Lok Sabha Election
माझा अजेंडा विकासाचा आहे, माझे विरोधकांनाही आवाहन आहे, की त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. त्यामुळे 2009 मध्ये कल्याण काळे यांनी मला टक्कर दिली होती आणि आता ते पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतील हा दावा पटण्यासारखा नाही. आता ती परिस्थीती राहिलेली नाही, त्यामुळे मी रिलॅक्स असल्याचे सांगत दानवे यांनी आपण काळे यांना गांभीर्याने घेत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. Latest Lok Sabha Election 2024
लोकशाहीत टीका करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पंधरा वर्षांत काय काय बदलले हे काळे यांना अजून माहीत नाही. ज्या कार्यकर्त्यांना ते स्वतःचे म्हणजे काँग्रेसचे समजून कामाला लागा म्हणून फोन करत आहेत, ते दहा वर्षांपासून भाजपमध्ये BJP म्हणजे माझ्यासोबत आहेत, असा टोला दानवे यांनी काळेंना लगावला.
ज्यांना आपले जुने सहकारी, कार्यकर्ते आता कुठे आहेत, हेच माहीत नाही, ते मला काय टक्कर देणार? असा चिमटा काढत दानवे यांनी काळेंना विकासाच्या मुद्द्यावर माझ्याशी लढा, असे आव्हान दिले आहे. दुसरीकडे काळे यांनी या वेळी जालना लोकसभा मतदारसंघात निश्चित परिवर्तन घडवणार असल्याचा दावा करत दंड थोपटले आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.