Maharashtra Lok Sabha Results : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीत महायुतीच्या रावसाहेब दानवे यांनी अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्यावर अडीच हजार मतांनी आघाडी घेतली होती.
त्यामुळे दानवे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा उत्साह फारसा टिकला नाही. त्यापुढील दोन्ही फेऱ्यांमध्ये रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांची आघाडी मोडून काढत कल्याण काळे चौथ्या फेरी अखेर 4920 हजार मतांनी पुढे निघाले. त्यामुळे जालन्याची लढत शेवटपर्यंत रंगतदार ठरणार,असे चित्र आहे.
विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना लक्षणीय मतं मिळताना दिसत आहेत. त्यामुळे मंगेश साबळे जालनाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात, असे चित्र आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाला तेव्हा काँग्रेसचे कल्याण काळे यांना 83 हजार 394 तर महायुतीचे रावसाहेब दानवे यांना 78474मते मिळाली आहेत.
तर अपक्ष मंगेश साबळे(Mangesh Sable) हे 28 हजार 050मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जालना लोकसभा मतदारसंघासाठी रेकॉर्ड ब्रेक 71 टक्के मतदान झाले होते. 13 मे रोजी मतदान झाल्यानंतर महायुती महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी आकडेमोड केल्यानंतर काँग्रेसचे कल्याण काळे विजयी होतील असा दावा केला जात होता.
यामुळेच काळे यांनी निकाला आधीच मतदार संघात आभार यात्रा काढत आपल्या विजयाची खात्री पटवून दिली होती. आज प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यानंतर कलही त्याच दिशेने जाताना दिसतो आहे. मराठा आरक्षणामुळे महायुती सरकारच्या विरोधातील मतदान मंगेश साबळे यांच्याकडे किती प्रमाणात वळते यावर जालन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.
रावसाहेब दानवे जालन्यातून डबल हॅट्रिकच्या तयारीत आहेत मात्र यावेळी त्यांना काँग्रेसच्याच कल्याण काळे यांनी 2009 प्रमाणे यावेळी ही खिंडीत गाठल्याचे सुरुवातीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.