Manoj Jarange Death Threat Sarkarnama
मराठवाडा

Beed Walmik Karad Supporter Call : "जरांगेंना संपवू" कटाचा आवाज बाहेर! कराड समर्थकाचं कॉल रेकॉर्डिंग लिक; राज्यात राजकीय भूकंप (Video)

Manoj Jarange Death Threat: Supporter of Beed Walmik Karad Calls, Audio Recording Goes Viral : बीडमधील वाल्मिक कराड समर्थकाचे मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचं काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political controversy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याचं कटकारस्थानाचा ऑडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक अन् संतोष देशमुख हत्येतील संशयित वाल्मिक कराड याच्या समर्थकाचे हा ऑडिओ असल्याचे सांगितले जाते. जरांगे पाटील अन् वाल्मिक समर्थकांमधील हा काॅल झालेले असून, तोच ऑडिओ व्हायरल झाल्याचे, प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. परंतु या ऑडिओमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्याचं ऑडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यात संतोष देशमुख हत्येतील प्रमुख सूत्राधार वाल्मिक कराड याच्या समर्थकाचे हा ऑडिओ असल्याने, त्याची संवेदनशीलता वाढली आहे. यामुळे बीडमधील गुन्हेगारीला पुन्हा उजाळा मिळाला आहे.

बीडमधील (Beed) वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे पाटील समर्थकांमधील मोबाईलवरील संभाषणाचा ऑडिओ असल्याचे सांगितले जात असून, ते एकजण दुसऱ्याला बोलताना, थेट मनोज जरांगे पाटील यांना मी गोळ्या घालून जीवे मारणार आहे, असा संवाद आहे. याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणायचे नाही, नाहीतर तुलाही जीवे मारतो, अशी जरांगे समर्थकालाही जीवे मारण्याची धमकी कराड समर्थकांने दिल्याचे, कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळत आहे.

वाल्मिक कराड अन् जरांगे पाटील समर्थकांमध्ये झालेले संभाषण पुढीलप्रमाणे...

जरांगे समर्थक : पाटलांना काय करणार?

कराड समर्थक : मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या, मी स्वतः गोळ्या घालतो...

जरांगे समर्थक : तू घालणार आहेस का?

कराड समर्थक : स्वतः घालतो गोळ्या...

जरांगे समर्थक : काय करणार आहेस तू पाटलांना...

कराड समर्थक : मी तर मनोज जरांगे यांना जीवच मारतो...

जरांगे समर्थक : बरं चालतंय बर...

मनोज जरांगे यांच्यासह जरांगे समर्थकाला मोबाईलद्वारे धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड याचे नाव घेऊन धमकवले. तुझ्या.., जर गोळ्या नाही घातल्या, तर धन्या मुंडे आणि वाल्मिक कराड पुन्हा म्हणायचे नाही, अशी धमकी दिली आहे.

बीडच्या गुन्हेगारीत वाल्मिकचा आजही दबदबा?

संतोष देशमुख यांच्या हत्येत बीडमधील वाल्मिक कराड तुरुंगात आहे. या हत्येचा खटला बीड जिल्हा न्यायालयात सुरू आहे. परंतु, वाल्मिक कराड याचे समर्थकांचा आजही बीडच्या गुन्हेगारी विश्वात कारवाया सुरू आहेत. यातच हा ऑडिओ समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

जरांगे यांचा ओबीसी नेत्यांशी संघर्ष

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील राजकारण ढवळून काढलं. या वेळी जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना चांगलेच टार्गेट केले होते. तसंच संतोष देशमुख हत्येत तर धनंजय मुंडे यांना देखील जरांगे पाटील यांनी टार्गेट केलं. वाल्मिक कराड हा मुंडेंचा समर्थक आहे. यातच जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा ऑडिओ समोर आल्याने बीड अन् बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघू लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT