Arjun Khotkar-Jalna Crime News
Arjun Khotkar-Jalna Crime News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Political : खोतकरांच्या जावयाचा `झोल`, अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिंदे गटाचे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जून खोतकर यांचे जावई विजय झोल याच्याविरोधात जालन्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी (Fir Filed) गुन्हा दाखल झाला आहे. विजय झोल १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. झोल याने आपला भाऊ आणि मित्रांसोबत किरण खरात या व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती.

पुणे येथे अपहरण करून खरात यांना औरंगाबाद (Aurangabad)येथील एका हाॅटेलात डांबून ठेवण्यात आले होते. तसेच (Jalna) जालना येथे खरात यांच्या घरी जावून संबंधितांनी बंदूकीचा धाक दाखवत राहते घर, फ्लाॅट्स व इतर मालमत्ता जबरदस्तीने झोल व त्यांच्या कुटुंबियांनी लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या शिवाय विजय झोल याने आपले अंबड येथील सुखसागर हाॅटेल नावावर करून देण्यासाठी दबाव आणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील खरात यांनी म्हटले आहे. या प्रकरणी झोल, त्याचा भाऊ विक्रम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी या प्रकरणी अर्जून खोतकर हेच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेवून खोतकरांवर गंभीर आरोप केले आहेत. किरण खरात यांचे ४ जानेवारी रोजी पुण्यातून अपहरण करण्यात आले होते.

चार दिवस औरंगाबादेतील एका हाॅटेलात डांबून ठेवल्यानंतर जालन्याच्या घरी आणून विक्रम झोल याने फायरिंग केली. त्यांच्या नावावर असलेले प्लाॅट आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप देखील गोरंट्याल यांनी केला. या मागे खोतकर हेच असून त्यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गोरंट्याल यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची माहिती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT