Jalna Maratha Protest Sarkarnama
मराठवाडा

Jalna Maratha Protest : अजितदादा, "हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा " ; पटोलेंचे आव्हान

Maratha reservation : लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे.

Mangesh Mahale

Jalna : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी राज्यातील राजकारण पेटलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना "हिंमत असेल त्यांनी कारवाई करून दाखवा," असे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

"लाठीचार करणाऱ्यांवर अजितदादांना कारवाई करणार नाही, कारण त्यांचे उपमुख्यमंत्रीपद जाईल," असा खोचक टोला पटोलेंनी लगावला. नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे बोलत होते.

राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, सौम्य लाठीमार करा, मात्र मोठ्या प्रमाणात जालन्यात लाठीमार झालाय. ज्यांनी लाठीमार करण्याचा आदेश दिला तोच खरा गुन्हेगार आहे. "वेडाच्या सरकारमध्ये अजित पवारांनी वेडे बनू नये," असे नाना पटोले म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. त्यांचे सहकारी यांच्यासोबत प्रशासनाची चर्चा सुरू असताना अचानकपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. या अमानूष लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना राजकीय नेते आता मराठा आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत आहेत.

शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी जालन्यात कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आंतरवाली सराटी गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर मराठवाड्यात संतप्त जमावाने ठिकठिकाणी वाहनांची जाळपोळ केली. शनिवारी अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT