Sangrambapu Bhandare Maharaj speech Sarkarnama
मराठवाडा

Sangrambapu Bhandare Maharaj speech : आमदार जगतापांनी हिंदू रक्षणासाठी ठिकठिकाणी 'संग्राम बेकरी' काढावी; भंडारे महाराजांचा 'भन्नाट' सल्ला!

Jalna Sakal Hindu Samaj Morcha Speeches by Sangrambapu Bhandare & NCP MLA Sangram Jagtap : जालना इथं सकल हिंदू समाज मोर्चात संग्रामबापू भंडारे महाराज आणि अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांची जोरदार भाषण झाली.

Pradeep Pendhare

Jalna Sakal Hindu Samaj Morcha : जालना इथं आज सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा झाला. संग्रामबापू भंडारे महाराज अन् अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप या दोघांनी सभा भाषणांनी गाजवली. संग्रामबापू भंडारे महाराज यांनी हिंदू रक्षणासाठी आमदार जगताप यांना दिलेल्या भन्नाट सल्ल्याची चर्चा सभेनंतर चांगलीच रंगली आहे.

'हिंदुच्या रक्षणासाठी मोठा ब्रँड 'संग्राम बेकरी' सुरू करावा, त्याच्या फ्रँचायझी गावोगावी वाटाव्यात, आपण दोघं उद्घाटनाला जाऊ,' असा भन्नाट सल्ला संग्रामबापू भंडारे महाराजांनी आमदार जगतापांना दिला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं आज सकल हिंदू समाजाच्यावतीने आक्रोश सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संग्रामबापू भंडारे महाराज आणि अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) सहभागी झाले होते. या दोघांनी जोरदार भाषणं झाली. हिंदू रक्षणासाठी संग्रामबापू भंडारे महाराजांनी सभेतील भाषणाच्या शेवटी आमदार जगतापांना दिलेला भन्नाट सल्ला चर्चेत आला आहे.

संग्रामबापू भंडारे महाराज म्हणाले, "महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक नेता भगवाधारी बनवायचा, प्रत्येक नेता हिंदुत्ववादी बनवायचा आहे. त्यासाठी पर्याय एकच आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला हिंदू, हिंदुत्वावादी झाला पाहिजे. जगातील धर्म धर्माने नावानं एकत्र आले. मतदान धर्माच्या नावानं करतात, उद्योग-व्यवसाय देखील धर्माच्या नावानं करतात, फक्त हिंदू आवो-जावो घर तुम्हारा."

उद्योग-व्यवसाया मुद्यावर बोलताना, 'मी सर्वांना सांगतो, बेकरी व्यवसायात या, हिंदू राम, शंकर, कृष्णाच्या नावानं बेकऱ्या टाका. हिंदूची एक भूमिका आहे, आम्हाला वडापाव खायचा आहे, पण पाव हिंदुनी बनावलेला पाहिजे, असे सांगून संग्रामदादांना (आमदार जगताप) विनंती आहे की, तुम्ही ठरवलं तर, हे शक्य आहे. तुम्ही एक मोठा ब्रँड तयार करा, 'संग्राम बेकरी'! वाटू फ्रँचायझी गावागावात. ओपनिंगला दोघं जात जाऊ. गिऱ्हाईकच गिऱ्हाईक, पोरांना उद्योग-व्यवसाय सुरू होईल अन् हिंदू बांधव देखील सुरक्षित राहील, असा भन्नाट सल्ला संग्रामबापू भंडारे यांनी आमदार जगताप दिला. भंडारे महाराजांच्या सल्ल्यावर तिथं सभेत शेजारी बसलेल्या आमदार जगतापांना देखील हसू आवरता आले नाही.

भंडारे महाराजांचं वादग्रस्त विधान

संग्रामबापू भंडारे महाराज यांनी, गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर, स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दुसऱ्या रामाच्या (नथुराम गोडसे) घोषणा द्या, असं सांगताच, गावागावात लॉरेन्स् बिष्णोई तयार व्हायला पाहिजे, असं वादग्रस्त विधान केलं.

आमदार जगतापांची मोठी मागणी

आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्या आणि गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर 'मकोका'प्रमाणे कारवाई व्हावी, तसेच हत्या झालेल्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्याचा निलंबन करावे, अशी मागणी लावून धरल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा झाली असून, हिवाळी अधिवेशनात त्यावर सकारात्मक निर्णय होण्याचे संकेत दिले आहेत, असेही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT