Deepak Borhade news.jpg Sarkarnama
मराठवाडा

Deepak Borhade : जालन्यातून धक्कादायक अपडेट; धनगर आरक्षण आंदोलन तापलेलं असतानाच दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्यानं जीवन संपवलं

Dhangar Reservation Protest: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदान व परिसरात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलन दीपक बोऱ्हाडे यांना धक्का देणारी एक घटना समोर आली आहे.

Jagdish Pansare

Jalna News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदान व परिसरात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलन दीपक बोऱ्हाडे यांना धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. त्यांच्या सासर्‍याने जालना येथे बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानीच त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जालना शहरातील छत्रपती कॉलनी परिसरात राहणाऱ्या रामराव दामू पाटील (वय 58) यांनी बुधवारी (ता. 25) आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. मुंबईत धनगर आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असतानाच या दुर्दैवी घटनेने बोऱ्हाडे यांची चिंता अधिकच वाढवली आहे. आधीच दहा दिवसांच्या उपोषणामुळे दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली आहे.

त्यात सासर्‍याने आत्महत्या केल्यामुळे धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. रामराव पाटील हे काही दिवसांपासून आजारी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जावई दीपक बोऱ्हाडे मागील दहा दिवसांपासून आरक्षणासाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत असून सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याच्या कारणावरून सासरे रामराव पाटील यांनी आत्महत्या केल्याची समाज माध्यमांवर समाज बांधवांकडून चर्चा सुरू आहे. मात्र या आत्महत्याची नेमके कारण रात्री उशिरापर्यंत अस्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT