Jat Assembly Election 2024  
मराठवाडा

Jat Assembly Election 2024 : महिला सक्षमीकरणासाठी विक्रम सावंत यांना साथ द्या - वर्षाताई सावंत

मागच्या पाच वर्षांपूर्वी सर्वांनी जो विश्वास दाखवून विक्रम सावंत यांना विधानसभेत पाठवले. त्याच विश्वासाने त्यांनी जत शहरासह तालुक्यातील प्रश्नांना न्याय दिला आहे. तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

जत : मागच्या पाच वर्षांपूर्वी सर्वांनी जो विश्वास दाखवून विक्रम सावंत यांना विधानसभेत पाठवले. त्याच विश्वासाने त्यांनी जत शहरासह तालुक्यातील प्रश्नांना न्याय दिला आहे. तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.

दुसऱ्यांदा त्यांना आणखी कामाची संधी द्या. महिला सक्षमीकरण, त्यांच्या हाताला रोजगार देण्याची भूमिका आमदार विक्रम सावंत यांनी घेतली आहे. त्यांना साथ द्यावी, असे आवाहन सौ. वर्षाताई विक्रम सावंत यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या प्रचारानिमित्त सौ. सावंत यांनी जत शहरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सौ. नलिनी शिंदे, गितांजली शिंदे, मनीषा साबळे, रेश्मा पठाण, ज्योत्‍सना पाटील, स्वाती भोसले, संगीता चव्हाण, साक्षी साबळे, ज्योत्सना पाटील, साक्षी सावंत, संस्कृती सावंत, स्वाती सुर्वे, शारदा भोसले, ललीता सावंत आदी सहभागी झाल्या होत्या.

सौ. सावंत म्हणाल्या, ‘वीस वर्षांपासून विक्रम सावंत जत शहराचे कुटुंबप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शहरातील प्रत्येक कुटुंबातील सुख-दुःखात ते सोबत राहिले. आज शहराच्या विकासासाठी महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठे काम केले. महिलांना स्वतंत्र व्यासपीठ देण्याचे काम केले. रोजगार, शिक्षणासाठी केलेले काम समोर आहे.

पहिल्यांदा पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. छोट्या छोठ्या घटकांचा विकास केला. ग्रामीण भागात बचतगटांचे सक्षमीकरण केले. महिलांसाठी असणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. आता दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करूया. जत तालुक्यात महिलांसाठी रोजगार निर्मिती करणारे व त्यांना सक्षम करणारे उद्योग, छोटे प्रकल्प मार्गी लावण्यास पहिले प्राधान्य असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याने अधिक गतीने कामास वाव मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT