Jayant Patil  Sarkarnama
मराठवाडा

अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जयंत पाटलांकडून दिलासा

अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) मराठवाड्यात (Marathwada) अनेक प्रकल्पांचे आणि शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

परभणी : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) मराठवाड्यात (Marathwada) अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. परभणी जिल्ह्यात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठक जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.

या बैठकीत जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. दरम्यान स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पांची, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली. ते प्रकल्प आणि प्रलंबित कामे पुर्ण करण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.त्यामुळे आता जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधाऱ्या पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमतेचे गांभीर्य लक्षात घेता कालव्यांची सुधारणा व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जाणार अल्याचे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT