Jayant Patil- Shivraj Patil Chakurkar News, Latur
Jayant Patil- Shivraj Patil Chakurkar News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil News : चाकूरकरांनीच मला राजीव गांधींकडून पहिल्यांदा तिकिट दिले होते..

राम काळगे

Latur : जुन्या माणसांचे कार्य हे भावी पिढीला आदर्श ठरतात, त्याप्रमाणे नवतरूणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. निलंगेकर साहेबांनी सिंचनाची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली हे विसरून चालणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीच मला माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्याकडे घेऊन जावून पहिल्यांदा तिकीट दिले, होते अशी आठवण देखील सांगितली. (Jayant Patil) माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण कार्यक्रमात पाटील बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण आज करण्यात आले.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण भागात सिंचनाचे मोठ्या सुविधा निर्माण केल्या. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात खुप चांगले काम झाले. पश्चिम भागातील पाणी पूर्वेला आणल्याशिवाय मराठवाड्याचा विकास होणार नाही. जुने व्यक्ती, जुने नेते यांचे कार्य समाज उपयोगी असते. पक्षासाठीचे त्यांचे विचार आणि निष्ठा कायम स्मरणात राहील. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे चारित्र्य संपन्न व निर्वसणी नेतृत्व होते म्हणूनच त्यांनी दहा वेळा या मतदार संघाचे नेतृत्व केले.

आमचे व आमच्या वडीलांचे त्यांच्यांशी घनिष्ठ संबाध होते. मराठवाड्याच्या सिंचनासाठी आपण येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद करावी, अशी मागणीही त्यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मी केवळ जलसंपदा मंत्री होतो तुम्ही जलसंपदा मंत्री व अर्थमंत्रीही आहात, त्यामुळे सिंचनासाठी भरीव तरतूद करावी, असेही पाटील म्हणाले. केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळेच मला पहील्यांदा उमेदवारी मिळाली, असा खुलासाही पाटील यांनी आपल्या भाषणात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT