Jayant Patil On BRS News  Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil On BRS News : शेतकऱ्यांच्या मत विभाजनासाठी बीआरएसचे नवे दुकान...

Ncp : सावध राहा गावा-गावत जाऊन शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पोहचावा.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामुळे सरकार विषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही मते विरोधकांच्या बाजूने जाण्याची भिती असल्यामुळे नाराज शेतकऱ्यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी नवीन पक्षाचे दुकान उघडण्यात आले असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (Jayant Patil On BRS News) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराच्या समारोप कार्यक्रमात पाटील बोलत होते.

देशात शाह-फुले-आंबेडकर यासह छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले, आहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने काही राजकीय नेते, पक्ष, राज्यपाल बोलले. (Jayant Patil) या माध्यमातून आपल्या श्रध्देवर अप्रत्यक्ष हातोडा मारण्याचे काम करण्यात येत आहे.आता जर छत्रपती शिवाजी महाराजाचे राज्य असते तर असे बोलणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या.

अजून परिस्थिती बिकट बनत चालली आहे, पुन्हा शाहू-फुले -आंबेडकरांच्या विचाराचे राज्य आणायचे असेल तर बहुजनाला जागे करणे गरजचे आहे. (Ncp) आता निवडणूकी येत असल्यामुळे राज्यात नवीन पक्षाचे दुकान सुरु झाले आहे. अनेकजण त्या दुकानात जाऊन चाचपणी करत आहेत. नाराज असलेल्या मतदारांना भूलवण्यासाठीच हे नवीन दुकान आहे. (Marathwada) राज्यात शतेकरी त्रस्त आहे, त्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत सरकार जाहिराती देण्यात व्यस्थ आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेवून मतांचे विभाजन करण्याचा हा डाव आहे. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणजे ती आमच्यासाठी सत्तेपर्यंत जाण्याची सीडी आहे म्हणून नव्हे, तर त्यांच्या विचाराने आम्ही काम करत आलो आहोत आणि यापुढेही करणार, अशी ग्वाही देखील जयंत पाटील यांनी दिली. आपल्या देशात ७५ वर्षे सोडली तर ब्रिटीशाच्या काळापासून अंधश्रध्दा होती. पंतप्रधान पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले, तेव्हाच्या मंत्रीमंडळाचा फोटो संसदेत होता. आताच्या पंतप्रधानसोबत तर सर्व सांधू-संत दिसत आहेत.

या माध्यमातून राज्यभिषके करून घेतल्याचेही सर्वत्र बोलले जात आहे. यामुळे आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचे जाणवते. उद्या धर्मसंस्था स्थापन करुन ते सांगतील त्या पध्दतीने कामकाज चालेल, अशी टीकाही पाटील यांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे विचार मिटविण्याचे काम करण्यात येत आहे. आता २०२४ हीच शेवटची संधी त्यांचे विचार वाचविण्याची असेल. त्यामुळे सावध राहा गावा-गावत जाऊन शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पोहचावा असे आवाहन करतांनाच महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT