Ncp State President Jayant Patil News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil : शरद पवार चमत्कार घडवू शकतात, हा लोकांना विश्वास..

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला. (Jayant Patil, Ncp)

सरकारनामा ब्युरो

बीड : राज्याच्या व देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार हे चमत्कार घडवू शकतात, असा विश्वास जनतेला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी हाच राज्यातील नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. (Sharad Pawar) त्यामुळे हे यश कायम टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रिपणे प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

बीड येथील कार्यकारणी आढावा बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. गेल्या तीन दिवसांपासून जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर होते. (Beed) बीड येथील बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादीच्या यशात बीड जिल्ह्याचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केला.

जंयत पाटील म्हणाले, बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपला पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पाहायचे असेल तर पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागून सभासद नोंदणी अभियान यशस्वी केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गावागावात पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला. देशाच्या राजकारणात आदरणीय शरद पवारसाहेब कोणताही चमत्कार करु शकतात, हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे. यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी सभासद नोंदणीचा आढावा घेणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी बीड जिल्ह्याचे फार मोठे योगदान आहे. लोकशाहीत निवडणुकांना महत्त्व आहे. त्यामुळे ज्याला पद हवे आहे, त्याला निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी माजी खा. जयसिंगराव गायकवाड, आ. प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर, संजय दौंड, माजी आमदार अमरसिंह पंडीत, राजेश्वर चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT