उस्मानाबाद : विधान परिषदेच्या (Legislative Council Election) पाच जागांच्या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. पण, काही ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला आहे, अशी माहिती यायला लागली आहे. तरीही महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. (Jayant Patil's big statement : Use of money in Legislative Council Elections)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विधान परिषदेतील पैशाच्या वापराबाबत भाष्य केले. आमदार पाटील म्हणाले की, पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याबाबत एक दोन दिवसांत निर्णय होईल. बिनविरोधबाबत काय प्रतिसाद द्यायचा याचा निर्णय महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी एकत्र बसून ठरवतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच उपस्थित होते. शिवसेना आणि काँग्रेसचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत, हे मला माहिती नाही. संसदेच्या अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्री अशा बैठका बोलवतात. त्यात महाराष्ट्रातील प्रश्न कोणत्या सरकारने कुठपर्यंत नेले आहेत. तसेच, खासदारांनी त्याला कशी साथ द्यायची, कसे प्रयत्न करायचे, याबाबतची चर्चा या बैठकीत होत असते. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत, याबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यांच्या गैरहजेरीबाबत मी बोलणं योग्य नाही, असे सांगून खासदारांच्या गैरहजेरी बाबत बोलणे टाळले.
डॉलर ८२ रुपयांवर पोचला आहे. तो शंभरीवर पोचू नये, यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. देशात महागाई उच्चांकी पातळीवर पोचलेली आहे. सामान्य जनता अस्वस्थ झालेली आहे, त्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे, पाहू. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्रीच भाष्य करू शकतात. मी सध्या मुख्यमंत्री नाही. मी विरोधी पक्षातील एक आमदार आहे, असे भाष्य मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.