Jaydatta Kshirsagar News Sarkarnama
मराठवाडा

Jaydatta Kshirsagar News : माझा फोटो वापरुन संभ्रम निर्माण करू नका; क्षीरसागरांनी पुतण्याला फटकारले..

NCP News : अखेर योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला.

Datta Deshmukh

Beed Political News : काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नकारानंतरही पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेशाचा निर्णय अंतिम केला. (Yogesh Kshirsagar Join NCP) आज मुंबईत दुपारनंतर उपमुख्यमंत्री पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मात्र, प्रवेशासंदर्भातील बॅनरवर वापरलेल्या फोटोंवरुन जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्याला फटकारले आहे.

आज मुंबईत होत असलेल्या पक्षप्रवेशाशी आपला कुठलाही संबंध नसताना आपला फोटो वापरुन कार्यर्त्यांची व जनतेची दिशाभूल संभ्रम निर्माण केला जात असल्याचे (Jaydatta Kshirsagar) जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर सध्या कुठल्याच पक्षात नाहीत. राज्यात नवे राजकीय समिकरण उदयास आल्यानंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांनी (NCP) राष्ट्रवादीत प्रवेशाची इच्छा व्यक्त केली.

मात्र, त्याला जयदत्त क्षीरसागर यांनी नकार दिला. महिनाभराच्या खलानंतर अखेर योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला. (Beed News) बुधवारी मुंबईतील चर्चगेट परिसरातील गरवारे हॉल या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आदींसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रवेशासंदर्भात छापलेल्या विविध बॅनरवर जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो छापले आहेत.

त्यावरुन त्यांनी पुतणे योगेश क्षीरसागर यांना दुसऱ्यांदा फटकारले आहे. पक्षप्रवेश निश्चित झाला तेव्हा आपण कधीही स्वार्थासाठी राजकीय निर्णय घेतला नाही. जनतेचा कौल हाच आपला निर्णय असून जनतेच्या प्रश्नासाठी आपण कायम संघर्ष करत राहू, प्रश्नांसाठी पाठपुरावा करत राहू असे त्यांनी म्हटले होते. आता फोटोवरुनही आपण सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही माझ्या फोटोचा वापर करुन जनतेची, कार्यकर्त्यांची दिशाभूल व संभ्रम निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT