Ex. Minister Jaydatta Kshirsagar
Ex. Minister Jaydatta Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

रेशीम-सिताफळ उत्पादकांसाठी जयदत्त क्षीरसागरांनी उपलब्ध करुन दिली बाजारपेठ

Dattatrya Deshmukh

बीड : राज्यात रेशीम उत्पादनात अव्वल असलेल्या जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची व सोयीची बाजारपेठ नव्हती. त्यामुळे भरमसाठ उत्पादन होऊनही विक्रीसाठी मोठी अडचण होई. तीच गत जिल्ह्यात उत्पादन होत असलेल्या नैसर्गीक सिताफळाबातही आहे. मात्र, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे रेशीम उत्पादक व सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना आता हक्काची व बीडसारख्या ठिकाणी सोयीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

शनिवारी (ता. सहा) भाऊबीजेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम कोष खरेदी - विक्री बाजार पेठेचा व सिताफळ प्रक्रिया सुविधा केंद्राची सुरुवात क्षीरसागर यांच्या हस्ते बीडमध्ये झाली. पाच कोटी रुपये खर्चाच्या मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत सीताफळ प्रक्रिया प्रकल्पाचे भूमीपूजनही क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले.

क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील बीड दुध उत्पादक संघही आता केशर दुध, तुप, दही, पनिर, श्रीखंड असे विविध पदार्थ निर्निती करत असून बाजारपेठेत याचे चांगलेच नाव झाले आहे. याचा फायदा दुध उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. तसेच त्यांच्या अखत्यारित असलेल्या सुतगिरणीतून निर्मिती होणाऱ्या सुतालाही परदेशात मागणी आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मागच्या काही वर्षांपासून रेशीम शेती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मागच्या वर्षी राज्यात सर्वाधिक रेशीम उत्पादन बीड जिल्ह्यात झाले. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात जेवढे रेशीम उत्पादन होते तेवढे उत्पादन बीड जिल्ह्यात होते. मात्र, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीसाठी बंगळुरु, जालना आदी दुरच्या ठिकाणी जावे लागे.

तिच गत सिताफळाबातही आहे. जिल्ह्यात नैसर्गीक पद्धतीने उत्पादन होणाऱ्या सिताफळाची चव न्यारी आहे. अलिकडे सिताफळाच्या बागाही वाढल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात सिताफळ प्रक्रीया उद्योग नसल्याने या शेतकऱ्यांनाही अडचण होती.

त्यामुळे या रेशीम व सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचे योग्य मोल मिळत नसे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन बीड बाजार समितीमध्ये रेशीम - कोष खरेदी सुरु केली आहे. याच ठिकाणी लवकरच रेशीम कोष वर प्रक्रिया करणारा उद्योगही उभारण्यात येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

या कार्यक्रमास रेशीम उत्पादक शेतकर्‍यांसह रामनगर (कर्नाटक), भंडारा, परळी, रूई, पांगरी, वरपगाव, होळ, सांगली, अंबेजोगाई, तेरखेडा, वडगाव ढोक, मुरूड येथील तसेच राज्यासह बाहेर राज्यातून व्यापारी रेशीम खरेदीसाठी उपस्थित राहिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT