Congress-NCP Sarkarnama
मराठवाडा

MVA News : जिंतूर मतदारसंघावरून 'माविआ'मध्ये रस्सीखेच; काँग्रेस, राष्ट्रवादीने केला दावा

Political News : जिंतूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा कला असल्याने महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

Sachin Waghmare

Parbhani News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आघाडीतील सर्वच पक्षांचा कॉन्फिडन्स दुपटीने वाढला आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर आली असल्याने सर्वच जण गेल्या काही दिवसापासून रणनीती ठरविण्यात व्यस्त आहेत. त्यातच आता जिंतूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा कला असल्याने महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

जिंतूर मतदारसंघात सध्या भाजपच्या मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) कोण निवडणूक लढणार यावरून चुरस पाहावयास मिळत आहे. आघाडीतील दोन्ही पक्षाने दावा केला असल्याने जागावाटपात ही जागा कॊणाच्या वाट्याला सुटणार यावरून रस्सीखेच पहावयास मिळत आहे. (MVA News)

काँग्रेसची आढावा बैठक नांदेडमध्ये पार पडली. यावेळी जिंतूरमधून काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी उमेदवारी मागितली. हा मतदारसंघ काँग्रेस विचारधारेचा असून अनेक वर्ष बाल्लेकिला राहिला आहे. या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने जिंतूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेस श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

जिंतूर मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आपली कारकीर्द सुरू केली. पण 2019 मध्ये विजय भांबळे यांचा भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी पराभव केला. विजय भांबळे यांना तीन हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता.

आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटणार असल्याची चर्चा होती. गेल्या पाच वर्षापासून विजय भांबळे हे या मतदारसंघात तयारी करत आहेत. निसटता पराभव झाला असला तरी विजय भांबळे यांनी मतदारसंघातील आपला संपर्क कमी होऊ दिला नाही. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी तयारी सुरु केली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांनी आपल्या प्रचाराचा जोर धरला असला तरी दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र या विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिंतूर विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. या मतदारसंघावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT