Shivsena News : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेले. आणखी पंधरा आमदार आॅपरेश टायगर-2 अंतर्गत पक्ष सोडणार आहेत, असा दावा फुटून गेलेले खासदार करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी परभणी, धाराशीव, हिंगोली या तीन जिल्ह्यांचा दौरा नुकताच केला.
पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा झाली ती ओमराजे निंबाळकर यांची. धाराशीव जिल्ह्यातील खासदार-आमदारांची जोडी आणि त्यांची घट्ट मैत्री ही राज्यभरात प्रसिद्ध होती. ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडून गेल्यानंतर धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्याकडेही संशयाने पाहिले गेले. मात्र मी स्वःताची गॅरंटी देऊ शकतो, ओमराजेंची नाही म्हणत त्यांनी आपण कुठेही जाणार नाही, आहे त्याच पक्षात राहणार असे जाहीर केले होते.
रविवारी उद्धव ठाकरे यांच्या आणि धाराशीव-कळंब मतदारसंघातील मतदार, सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांच्या समक्ष पुन्हा कैलास पाटील यांनी काही झालं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा शब्द जनतेला दिला. तर काही झालं तरी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे वचन उद्धव ठाकरे यांना कैलास पाटील यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांच्या समोर कैलास पाटील यांनी मोजक्या शब्दांत पण आश्वासक असे भाषण केले. गेल्या दहा-बारा वर्षापासून धाराशीव जिल्ह्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर-आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यातील घट्ट मैत्री कायम आहे. ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा कैलास पाटील यांनी त्यांची समजूत घालण्यासाठी फोनवर संपर्क केला, पुण्यात त्यांना भेटायला गेले पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर ओमराजे यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाल्याचे समोर आले.
दरम्यान, कैलास पाटील यांना तुम्हीही उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला गेला. ओमराजे निंबाळकर आणि तुमची घट्ट मैत्री आहे, मग त्यांनी निर्णय घेण्याआधी तुमच्यासोबत चर्चा केली का? असे अनेक प्रश्न माध्यमांकडून त्यांना विचारले गेले. त्यावर मी माझी गॅरंटी देऊ शकतो, ओमराजेंची नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपण कुठेही जाणार नाही, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे ठळकपणे सांगीतले होते. उद्धव ठाकरे यांच्या धाराशीव दौऱ्यात कैलास पाटील यांनी पुन्हा एकदा आपण पक्ष सोडून जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
धाराशिव जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे, इथे निष्ठेचा महासागर असून ही तादक पुन्हा दाखवून देऊ, अशा विश्वासही कैलास पाटील यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही अभेद्यच राहणार, यावर हजारो शिवसैनिकांनी आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याची भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.