Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

Kalyan Kale News : कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर माझा नंबर होता; शरद पवार गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितले

Sachin Waghmare

Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचा सपत्निक सत्कार शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे म्हणाले, जालना मतदारसंघातून कल्याण काळेंनी (Kalyan Kale) उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती. खासदार कल्याण काळे हे जायंट किलर ठरले असल्याचे सांगत आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Kalyan Kale News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमास खासदार निलेश लंके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्य सरकार टक्केवारी वर चालले आहे. कल्याण काळे आणि निलेश लंके यांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडावे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाही बुडवायला निघाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जालना जिल्ह्याच्या इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो. देशाचे संविधान वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केले. दुधाच्या दरा संदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी. मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले आहे, त्या बाबत भूमिका शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असेही कल्याण काळे म्हणाले.

यावेळी सुटले आहेत पुढच्या वेळी पाहतो

जालना मतदारसंघातून कोणी उभा राहावे, अशी चर्चा झाली त्यात राजेश टोपे यांचे नाव आले. यावेळी त्यांनी चातुर्य दाखवले. त्यांनी माळ काळे यांच्या गळ्यात टाकली. यावेळी सुटले आहेत पुढच्या वेळी पाहतो. प्रत्येक वेळी सगळे आघाडीचे लोक एकत्र काम करत नाहीत पण या निवडणुकीत यावेळी आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले, असेही शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT