Kannad Assembly Election : महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांना पिशोर येथील सभेत रडू कोसळले
कन्नड : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अनेक ठिकाणी उमेदवारांकडून भावनिक आवाहन केले जात आहे. कन्नड विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांना काल पिशोर येथील सभेत रडू कोसळले. संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या असून पती हर्षवर्धन जाधव यांच्याकडून झालेला त्रास याबद्दलची वाच्यता जाहीर सभेतून करत माझा संघर्ष तुम्हीच संपवू शकता, अशी भावनिक साद घातली.
संजना जाधव यांनी थेट लग्न पासून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला कशा पद्धतीने त्रास दिला हे मतदारांना सांगितले. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले. मी लग्न होऊन एका महिन्यात घरी आले. वडिलांना याबाबत सांगितले तर म्हणाले, तुला एक मूल होऊ दे, मूल झाल्यावर हा माणूस सुधारेल. मूल झाल्यावर माझे वडील म्हणाले, चाळिशी झाली की माणूस सुधारत असतो. चाळिशी झाली, जे सहन केले त्याचा मोबदला मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर कोण आणले हे तुम्हाला माहिती आहे.
माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप लावण्यात आले. परंतु, आम्ही सगळे सहन केले. कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात. मुलाचा बाप असता तर रस्त्यावर उतरला असता. मुलीचा बाप होता म्हणून ते शांत बसले. आपले संस्कारच आहेत, आई म्हणाली होती आता तू घरून जात आहे, तू परत येशील तेव्हा तिरडीच आली पाहिजे. तू एकटी नाही आली पाहिजे. आईने सांगीतल्याप्रमाणे मी संसार केला. पण मला काय मिळाले? मी आत्तापर्यंत कधीच रडले नाही.
कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, हे गांव माझे म्हणून भरून आले. मी काय केले आणि काय केले नाही हे सगळ्यांना माहीत आहे, असे संजना जाधव म्हणाल्या. संजना जाधव यांनी आत्तापर्यंतच्या प्रचारात फक्त विकास कामे व मतदार संघातील लोकांसाठी काय करणार याबाबत भूमिका मांडली होती. परंतु पहिल्यांदाच त्या स्टेजवर हर्षवर्धन जाधव यांच्या विषयी बोलल्या. तसेच हर्षवर्धन यांच्यामुळे त्यांना, त्यांचे वडील रावसाहेब दानवे यांना झालेला त्रास याबद्दल जाहीरपणे भाष्य केले. संजना जाधव यांच्या या भावनिक भाषणाची तालुक्यात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.