Kannad Assembly Election 2024 sanjana jadhav over ladki bahin scheme women empowerment sarkarnama
मराठवाडा

Kannad Assembly Election 2024 : लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वाभीमान मिळाला : संजना जाधव

विरोधकांकडून खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यांच्याकडे विकासाचे कसलेही व्हिजन नाही.

सरकारनामा ब्यूरो

कन्नड : विरोधकांकडून खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यांच्याकडे विकासाचे कसलेही व्हिजन नाही. उलट महायुतीच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या खिशात थेट पैसा दिला. रस्ते केले, शहर व ग्रामीण भागात विकासाच्या योजना पोचवल्या.

‘हा सूर्य हा जयद्रत’असा समोरासमोर दिसणारा विकास केला आहे, असा दावा महायुतीच्या अधिकृत उमेदवार संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचारादरम्यान केला. लाडकी बहीण ही योजना अत्यंत कमी वेळात यशस्वी झालेली योजना आहे. महिलांना या योजनेमुळे स्वाभिमान प्राप्त झाला आहे. ही योजना बंद पडणार असल्याचा अपप्रचार विरोधक करत असले तरी महिलांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.

मला मतांचा आशीर्वाद द्यावा, असे आवाहन संजना जाधव यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजना जाधव यांनी मंगळवारी (ता.१२) नागद-अंधानेर सर्कलमधील अंधानेर,

जामडी, मुंडवाडी तांडा, मुंडवाडी, उपळा, भांबरवाडी, लंगडा तांडा, टिकाराम तांडा, सातकुड तांडा, तेलवाडी, पांगर, भिलदरी, सायगव्हाण, शिवतांडा, हसनाबाद, वडगाव, हरसवाडी, नागद तांडा, बेलखेडा तांडा, धनगरवाडी, गोपेवाडी, सोनवाडी आदी ठिकाणी भेटी देऊन नागद येथील सभेत मतदारांशी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT