Dhananjay Munde,Karuna Munde

 

sarkarnama

मराठवाडा

धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे मुंडे म्हणाल्या.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे याच्यावर गंभीर आरोप करुन चर्चेत आलेल्या करुणा शर्मा-मुंडे यांनी आज नव्या पक्षाची स्थापना करुन रणशिंग फुंकले. 'शिवशक्ती सेना' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. शिवशक्ती सेनेच्या माध्यमातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्षस्थापनेनंतर आपण निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलयं.

''आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा रंगली आहे.

''शिवशक्ती पक्षाची अधिकृतपणे स्थापना करण्यासाठी ३० जानेवारी २०२२ रोजी अहमदनगरला मोठा मेळावा घेणार असून यावेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दौरा करणार आहे,'' असे मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

''अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला,'' असे करुणा मुंडे म्हणाल्या. '' काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. ''आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे (Karuna Munde) म्हणाल्या की, राज्याला भ्रष्टाचार मुक्त करणे, गरीब व्यक्तीवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी शिवशक्ती पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,''

एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसते. . पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे. सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितलं, ''आता मी माझे जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेला आवाहन आहे की एकत्र या, मी एक नवी सुरुवात करत आहे. चांगल्या लोकांचा पक्ष काढू, यामध्ये माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही,' असे मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT