Shankaranna Dhondge - K. Chandrashekar Rao Sarkarnama
मराठवाडा

K. Chandrashekar Rao: तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांची नांदेड जिल्ह्यात दुसरी सभा, धोंडगेसह अनेकांचा होणार प्रवेश..

Nanded : लोहा येथे येत्या २६ मार्च रोजी केसीआर यांची सभा आणि अनेकांचे प्रवेश होणार.

सरकारनामा ब्युरो

Nanded News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chnadrasekhar Rao) यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या विस्तारासाठी बांधणी करत आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नांदेडमधून त्यांनी आपल्या पक्षाच्या विस्ताराला सुरूवात केली आहे. शेतकरी आणि सामान्यांच्या कल्याणासाठी हा संकल्प घेत त्यांनी नुकतीच नांदेडमध्ये प्रचंड जाहीर सभा घेत राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता.

स्वाभीमानीचे राजू शेट्टी, (Raju Shetty) राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजलगावचे भाजप आमदार प्रकाश सोळुंके अशा नेत्यांना केसीआर यांनी गळ घातली होती.(Nanded) पैकी शंकरअण्णा धोंडगे आपल्या पुत्रासह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्यात या दोघांची केसीआर यांच्यासोबत बैठक झाली होती.

त्यानंतर लगेच धोंडगे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे ते बीआरएसमध्ये जाणार हे निश्चित होते. आता त्यांच्यासह अनेक माजी आमदार, खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय. शंकरअण्णा व त्यांच्या मुलाचा पक्षप्रवेश दणक्यात करण्यासाठी केसीआर नांदेड जिल्ह्यात दुसऱ्यांदा सभा घेत आहेत.

ज्या लोहा मतदारसंघातून शंकरअण्णा धोंडगे विधानसभेवर निवडून गेले होते, त्याच लोहा येथे येत्या २६ मार्च रोजी केसीआर यांची सभा आणि अनेकांचे प्रवेश होणार असलल्याची माहिती बीआरएसचे बोधनचे आमदार शकील आमीर यांनी दिली. लोहाच्या बैलबाजार मैदानावर २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता केसीआर यांची जाहीर सभा होणार आहे.

राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्य प्रश्नावर बोलतांना माजलगांवचे भाजप आमदार प्रकास सोळुंके यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आणि ते त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनांचे कौतुक केले होते. त्यामुळे शंकरअण्णा धोंडगे यांच्यानंतर सोळुंके काय निर्णय घेतात? याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT