Ambadas Danve On Kendrekar News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Kendrekar : केंद्रेकरांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले, दानवेंचा आरोप..

Sunil Kendrekar : नुकताच त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचनाही केल्या.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महिनाभरापुर्वी शासनाकडे केलेला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज काल मंजुर करण्यात आला. त्यांना ३ जुलैपासून भारतीय प्रशासन सेवेतून मुक्त करण्यात येणार आहे. (Ambadas Danve On Kendrekar News) सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीवरून अनेक तर्क लढवले जात असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र वेगळाच आरोप केला आहे.

केंद्रेकर हे स्वाभीमानी अधिकारी आहेत, शेतकऱ्यांना मदत करावी म्हणून त्यांनी राज्य सरकारकडे शिफारस केली आणि नेमका याचाच त्रास काही सत्ताधारी लोकांना झाला. (commissioner) त्यामुळेच केंद्रेकर यांच्यावर स्वेच्छा निवृत्तीसाठी दबाव आणण्यात आला, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

अंबादास दानवे म्हणाले, केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आले आहे. सुनील केंद्रेकर मराठवाड्याच्या (Marathwada) मातीशी नाळ जोडले अधिकारी आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि त्याबद्दल कळवळा आहे. नुकताच त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचनाही केल्या. (Maharashtra) याच्या बातम्या देखील वर्तमानपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्या होत्या.

केंद्रेकरांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत देखील होत होते. नेमका याचाच त्रास आणि राग सत्तेमध्ये बसलेल्या काही लोकांना आला. त्यातूनच केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. केंद्रेकर स्वाभिमानी अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT