Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Khaire : सगळे पन्नास गद्दार आमदार पडणारच, नाहीतर मी हिमालयात जाईन..

माझ्या हाती व्हाॅट्सअॅपवरील चॅटिंग हाती लागली आहे. त्यातील मजकुर पाहिला की मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी कसा पैसा खर्च केला जातोय. (Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : लोकांना गद्दारी आवडत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. जे गद्दारी करून गेलेत ते पन्नासच्या पन्नास आमदार पडल्याशिवाय राहणार नाही, अन्यथा माझे नाव बदला. मी हिमालयात निघून जाईन, असा दावा करतांनाच आई जगदंबेचा शाप या सगळ्यांना लागेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. शिंदेसेनेचा काल शहरात मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी (Shivsena) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

त्यानंतर शिंदेसेना व उद्धवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलिगतुरा रंगला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तर हे पन्नास पन्नास गद्दार आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावा केला आहे. (Marathwada) मुंबई येथील बीकेसीच्य मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्यात आल्याचा पुनरुच्चार करतांनाच त्यांनी याचा हिशेबच मांडला.

खैरे म्हणाले, माझ्या हाती व्हाॅट्सअॅपवरील चॅटिंग हाती लागली आहे. त्यातील मजकुर पाहिला की मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी कसा पैसा खर्च केला जातोय, एका शहरातून, तालुक्यातून किती गाड्या जाणार आहेत, त्यासाठी किती खर्च लागणार आहे याची यादीच माझ्या हाती लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी २९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

मग ३६ जिल्ह्यांसाठी ५२ कोटींपेक्षा अधिकचा खर्च गर्दी जमवण्यासठी लागणार आहे, हा पैसा मुख्यमंत्र्यांनी आणला कुठून? त्यामुळे या गद्दारांना जनता माफ करणार नाही. हे सगळे आमदार पडल्याशिवाय राहत नाहीत, अन्यथा माझे नाव बदला, मी हिमालयात निघून जाईल. हे सगळे गद्दार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात. जनतेला हे आवडलेले नाही, आई जगंदबेचा शाप या गद्दार आमदारांना लागल्याशिवाय राहणार नाही, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT