Bhumre-Khaire News  Sarkarnama
मराठवाडा

Bhumre-Khaire News : दानवेंशी गुफ्तगू, खैरेंना पाहताच भुमरेंचा काढता पाय...

Shivsena : सत्तांतरापासून खैरे-भुमरे ऐकमेकांवर हातचे न राखता टीका करतात. कधीकाळी खैरेंशिवाय भुमरेंचे पानही हलत नव्हते.

अतुल पाटील

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांविरुद्ध त्वेशाने बोलतात. मात्र, समोरासमोर आल्यावर त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगतात. लोकही या गप्पांचा आनंद घेतात, ते क्षण कॅमेऱ्यात टिपतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) टीव्ही सेंटर चौकातील पुतळ्याला अभिवादनासाठी पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आले होते.

त्याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही तिथेच होते. त्यांच्याशी भुमरे यांची बराचवेळ गुफ्तगू सुरू होती. (Shivsena) मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) येताच भुमरेंनी तिथून काढता पाय घेतला. जाधववाडी चौकातील बुलंद छावा युवा संघटनेच्या व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे चर्चा करत बसले होते.

तेवढ्यात, अंबादास दानवे यांना भुमरे यांच्या शेजारची खुर्ची रिकामी करुन देण्यात आली. दानवे देखील भुमरेंच्या शेजारी बसले, वेळ मिळताच भुमरेंनी इशारा करत दानवेंशी बोलायला सुरवात केली. (Marathwada) दानवेंच्या फेट्याच्या तुऱ्याच्या आडून भुमरेंनी बरेच हास्यविनोद केले, त्याला दानवेंनीही दाद दिली. बराचवेळ दोघात हा संवाद सुरू होता.

स्वागतानंतर शोभायात्रेला सुरवात झाली, तेव्हाही दानवे-भुमरे सोबतच होते. काहीवेळ चालल्यानंतर दानवेंना गराडा पडला आणि ते तिथेच बोलत थांबले. तर शेजारी भुमरे त्यांची वाट पाहात बराचवेळ ताटकळले. त्यानंतर दानवे गाडीत बसून टीव्ही सेंटर चौकातील व्यासपीठावर जाऊन बसले. तर तिकडे दानवेंची वाट पाहत उभे असलेले भुमरे यांना अचानक समोरून माजी खासदार चंद्रकांत खैरे दिसले. खैरेंना पाहताच भुमरेंनी अभिजीत देशमुख यांच्या कानात काहीतर सांगत तिथून काढता पाय घेतला.

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतांना देखील खैरे-भुमरेंनी एकमेकांसमोर येणे टाळले. राज्यातील सत्तांतरापासून खैरे-भुमरे ऐकमेकांवर हातचे न राखता टीका करतात. कधीकाळी खैरेंशिवाय भुमरेंचे पानही हलत नव्हते. मात्र आज खैरे शिवसेनेत फक्त नेते आहेत, तर भुमरे दुसऱ्यांदा सरकारमध्ये मंत्री झाले. आता दोघे वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे सातत्याने एकमेकांवर टीका करतात, कधीकधी पक्षनेतृत्वावरही निशाणा साधतात. त्यामुळे कदाचित हे दोन्ही नेते ऐकमेकांना टाळत असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT