Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Khaire : रिकाम्या गाड्या, काहींमध्ये पाच-दहा लोक ; अनेकजण भाषणाला दांडी मारून फिरायला गेले..

सभा, मेळाव्यांमध्ये कितीवेळ बोलायला हवे हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही, त्यामुळे लोक कंटाळले आणि निघून गेले. (Shivsena Leader Chandrakant Khaire)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मोठा गाजावाजा करून मुंबईच्या बीकेसी मैदानावर शिंदेंच्या मिंधे गटाने गर्दी केली. आमचे कृषीमंत्री यांनी पाठवलेल्या गाड्या रिकाम्या गेल्या तर काहींमध्ये पाच-दहाच लोकं होते. बरं जे मुंबईत भाषणासाठी आले ते भाषणाला दांडी मारून फिरायला गेले होते, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण रटाळ झाले, कितीवेळ बोलावे याचे भान न राहिल्याने लोक निघून गेले, असेही खैरे म्हणाले.

मुंबईत काल शिवाजी पार्क आणि बीकेसीवर पार पडलेल्या दोन दसरा मेळाव्याची तलुना होत असतांनाच आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. (shivsena) उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला जुना स्क्रीप्ट रायटर बदला असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली, तर एकनाथ शिंदे यांनी भाजपचीच स्क्रीप्ट वाचली अशी टीका उद्धव ठाकरे (Marathwada) गटासह विरोधकांनी केली आहे.

बीकेसीवरली गर्दीचा उल्लेख करत फडणवीसांनी शिंदे यांचीच शिवसेना खरी असा दावा केला आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही गर्दी कशी जमवली आणि आलेले लोक खरंच भाषण ऐकत होते का? असा सवाल करत टीका केली आहे. सरकारनामाशी बोलतांना खैरे म्हणाले, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा गाजावाजा करत प्रसार माध्यमांसमोर एक हजार गाड्या आणि ३० ते ३५ हजार कार्यकर्ते मुंबईत दसरा मेळाव्यासाठी नेणार असल्याचा दावा केला होता.

प्रत्यक्षात त्यांनी केलेल्या बऱ्याच बसेस या रिकाम्या परत आल्या. तर काहींमध्ये ५-१० लोक मुंबईत आले होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण अत्यंत रटाळ झाले, त्यामुळे अनेकांनी भाषणाला दांडी मारली आणि ते फिरायला गेले. त्यामुळे शिवतीर्थावरील उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा आणि भाषण सरस ठरले. मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलेले भाषण लांबले.

सभा, मेळाव्यांमध्ये कितीवेळ बोलायला हवे हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही, त्यामुळे लोक कंटाळले आणि निघून गेले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या लांबलेल्या भाषणावर टीका केली आहे.

फक्त गर्दी जमवणे म्हणजे लोक भाषण ऐकायलाच आले असा त्याचा अर्थ होत नाही, हे कालच्या गद्दारांच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झाले. या उलट शिवतीर्थावर मोजक्याच नेत्यांची भाषणे झाली. स्वःत आदित्य ठाकरे यांनी भाषण न करता इतरांना बोलण्याची संधी देण्याची भूमिका घेतली.

पक्षातील महिला नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषणे करून मिंधे गटातील नेत्यांना सडेतोड उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे भाषण देखील मुद्देसूद आणि संयमित झाले. काल मुंबईत मी उद्या एक गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातील आकडेवारी माझ्याकडे उद्यापर्यंत येईल, त्यानंतर मी तो करणार असल्याचेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT