जालना : अर्जून खोतकर यांचे गेल्या आठ दिवसांपासून तळ्यात-मळ्यात सुरू होते. अखेर आज त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. (Jalna) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार आणि खोतकर या तिघांचीच ही मिलीभगत आहे. दानवे-सत्तारांनी अनेकदा खोतकरांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, (Shivsena)आता ते त्यात पुरते अडकले आहेत, त्यांना बाहेर पडणं अवघड जाईल, अशा शब्दात संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी खोतकरांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाचे वर्णन केले.
अर्जून खोतकर यांचा आपलाल्याला एक फोन आला होता. कुटुंब अडचणीत असल्याचे कारण सांगत त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावर मी त्यांना शुभेच्छा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला, असेही घोसाळकर यांनी सांगितले.(Marathwada) गेल्या काही दिवसांपासून अर्जून खोतकर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीगाठी घेत होते.
प्रसार माध्यमांना मात्र त्यांनी आपण अजूनही शिवसेनेतच आहोत असे सांगून वेळ मारून नेली. जालन्यात गेल्यावर आपण निर्णय जाहीर करू असेही स्पष्ट केले होते. त्यानूसार त्यांनी आज शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. हे सांगत असतांना आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचेही सांगतिले. त्यानंतर घोसाळकर यांनी देखील खोतकरांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
घोसाळकर म्हणाले, अर्जुन खोतकर गेल्या आठ दिवसापासून ज्या पद्धतीने तळ्यात मळ्यात करत होते, त्यावरून अंदाज आलाच होता. खोतकर यांचा मला एक फोन आला होता, त्यांनी माझं कुटुंब अडचणीत आहे असं म्हणत शिंदे गटात जातअसल्याचे सांगितले. मी त्यांना शुभेच्छा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला.
भाजप आणि शिंदे एकत्र आहेत त्यामुळे ईडी कुणाची असा प्रश्न निर्माण होतो. असे असतांना शिवसैनिक म्हणून लढायचं की रडायचं ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खोतकर जाण्याने शिवसेनेवर कुठलाच परिणाम होणार नाही, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठवाडयात शिवसेना त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा देखील घोसाळकरांनी खोतकरांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.