Kishori Pednekar- Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Kishori Pednekar : ठाकरेंसोबत म्हणून आमचा छळ, पण आम्ही कफन बांधून उतरलोय..

Chhatrapati Sambhajinagar : निवडणूका कधीही येऊ द्या, पक्षाचे चिन्ह मशाल असेल तर त्यांच्या बुडाला आग लागलीच समजा.

सरकारनामा ब्युरो

Shivgarjana : सत्तेच्या जोरावर पक्ष घेतला, चिन्हही घेतले, आता मशालही काढून घेतील, पण आमचा पक्ष आणि निशाणी फक्त उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी निर्माण केलेले वादळ तुम्ही रोखू शकणार नाही. आम्ही कफन बांधून काम करतोय, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यानेच छळ होत असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी आईचे दूध विकणारा शिवसैनिक मला नको, असे सांगताच दुसऱ्या दिवसी सर्व दूध विके निघून गेले. (Shivsena) शिवसेनेत यापूर्वी अनेकांनी गद्दारी केली, पण यावेळी त्यांनी पक्षाच्या नावासोबत चिन्हही चोरले आहे. उद्धव ठाकरे यांना हरवायचेच असे सर्वांनी ठरवले आहे. पण तुम्ही हरवू देणार आहात का? येणारा प्रत्येक दिवस हा वैऱ्याचा आहे.

निवडणूका कधीही येऊ द्या, पक्षाचे चिन्ह मशाल असेल तर त्यांच्या बुडाला आग लागलीच समजा. मशाल नसेल तरी २०२४ ला त्यांचे बूड टेकू देणार नाही, असा इशाराही पेडणेकर यांनी दिला. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरेंवर टीका केली होती. रश्मी ठाकरे यांचे देखील त्यांनी नाव घेतले होते. यावर थेट नाव न घेता पेडणेकरांना महाजन यांना इशारा दिला.

तुम्ही आमच्या किचनमध्ये घुसत असाल तर वयाचा मान न ठेवता तुमच्या घरात महिलांचे काय प्रकरणे झाली ते बाहेर काढू, पुन्हा अशी चूक कराल तर शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ, असा दम दिला. माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिक हा आदेशाचे पालन करणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या संकटात हा निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबांच्या पाठीशी कायम आहे, असे सांगितले.

युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू म्हणाले, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासैनिक भक्कमपणे काम करत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसैनिक व युवासैनिक निवडणुका जिंकून दाखवेल. माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी केंद्र व राज्यसरकार वर टीका केली.

ईडीच्या धास्तीने भाजपमध्ये गेलेल्यांना आता कसे चांगले दिवस आले? याचे ते उत्तर द्या. येणाऱ्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मोहिमेचा प्रारंभ बुधवारी झाला. व्यासपीठावर माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार अनिल कदम, युवासेनेचे अंकित प्रभू, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन आदींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT