Ladki Bahin Yojana Sarkarnama
मराठवाडा

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज बाद! 'या' दोन नियमांचा केला भंग

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील फेक लाभार्थ्यांना दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. यामध्ये मराठवाड्यात सव्वा लाख लाभार्थी महिला बाद ठरल्या आहेत.

Amit Ujagare

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्रं दाखल करून योजनेचा लाभ घेतल्याचं आता उघड झालं आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांसह, खोटी माहिती देऊन निकष ओलांडून काहींनी अर्ज केले. नियम डावलून काही ठिकाणी या योजनेचा महिलांनी लाभ घेतला. याच फेक लाभार्थ्यांना या योजनेतून दूर करण्यासाठी शासनानं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दोन टप्प्यात सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये मराठवाड्यात झालेल्या सर्व्हेक्षणात सुमारे सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद ठरले आहेत.

लाडकी बहिण योजनेच्या निकषांनुसार, ६५ वर्षांवरील आणि २१ वर्षांखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसंच एकाच घरात केवळ दोन महिलांना याचा लाभ घेता येतो. पण हे दोन नियम डावलून मोठ्या प्रमाणावर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडं प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर शासनानं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यभर सर्वे केला. यांपैकी मराठवाड्यात सुमारे सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आलं आहे.

दोन टप्प्यात हा सर्वे झाला होता. त्यात पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील आणि २१ वर्षांखालील अर्ज केलेल्या महिलांचे आठ जिल्ह्यातील १,३३,३३५ अर्ज तपासण्यात आले, त्यात ९३,००७ अर्ज पात्र ठरले तर ४०,२२८ अपात्र ठरले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात एका घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी असे लाभार्थी शोधण्यात आले होते, यात एकूण ४,०९,०७२ अर्ज तपासण्यात आले, त्यातील ३,२४,३६३ पात्र ठरले तर ८४,७०९ अपात्र ठरले. म्हणजेच या दोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकूण १,२४,९३७ महिलांना योजनेतून बाद करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT