MNS Leader Bala Nandgaonkar-Dr. Nikhil Gupta
MNS Leader Bala Nandgaonkar-Dr. Nikhil Gupta Sarkarnama
मराठवाडा

`राजसभे`च्या परवानगीसाठी मनसेकडून शेवटचा प्रयत्न ; नांदगावकर पोलिस आयुक्तांना भेटणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेला अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी परवानगीची वाट पाहू नका, तयारीला लागा असे आदेश मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या आधीच दिले आहेत. (MNS) तरी देखील शेवटचा प्रयत्न म्हणून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे राजसभेच्या परवानगीसाठी (Police Commissinoer) पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांना भेटणार आहेत.

मनसेकडून सभेची तयारी, निमंत्रण, होर्डिंग, रॅली आणि झेंडे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. आता मुंबईहून नेते देखील शहरात दाखल होत असल्याने मनसैनिकांच्या उत्साहाला अधिकच उधाण येणार आहे. (Aurangabad) पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशावरून निर्माण झालेला गैरसमज खुद्द पोलिस आयुक्तांनीच काल दूर केला. त्यानंतर आज आता पोलिसांच्या अधिकृत परवानगीसाठी मनसेकडून प्रयत्न केला जात आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सभेसाठीच्या परवानगीसाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. अवघ्या चार दिवसांवर सभा आली असतांना अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. परवानगी मिळाली नाही, तरी सभा होणारच हे मनसेने या आधीच ठणकावून सांगितलेले आहे.

राज्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टीमेटम आघाडी सरकारला दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार व गृहविभागाने काही नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती.

गृहमंत्र्यांनी या सदंर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवल्यामुळे राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. आता संपुर्ण राज्याचे लक्ष हे राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT