Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : गेल्यावेळी पाच हजार मतांनी निवडून आलो, २०२४ मध्ये पन्नास हजार मतांनी येईन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या लोकसभा निवडणुकीत मी पाच हजार मतांनी निवडून आलो होतो. पण येणाऱ्या २०१४ मध्ये ५० हजार मतांनी निवडून येईन, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला. जालना येथील ईद मिलन कार्यक्रमात बोलातांना त्यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Aurangabad)

इम्तियाज जलील हे राज्यात किंवा परराज्यात गेले तरी आपल्या विजयाची चर्चा देशभरात झाल्याचे आवर्जून सांगतात. (Aimim) जालन्यातील ईद स्नेहमिलन आणि सत्कार समारंभात बोलतांना त्यांनी जातीयवाद आणि द्वेषाच्या राजकाराणाला आता थारा नसल्याचे सांगितले.

इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत जेव्हा मी पाच हजार मतांनी विजयी झालो, तेव्हा विरोधकांनी एक भितीची वातावरण लोकांच्या मनामध्ये तयार केले होते. एमआयएमचा खासदार आला, आता शहराचे काही खरे नाही, असे चुकीचे चित्र निर्माण केले गेले.

पण गेल्या अडीच तीन वर्षाच्या काळात मी व माझ्या पक्षाने जी काम शहरात व जिल्ह्यात केली, त्या माध्यमातून आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे २०२४ मध्ये मी पाच नाहीतर पन्नास हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येईल.

आमच्या भागातले नेते मला तुम्ही कोण? तुम्हाला काय कळते ? असं मला म्हणतात, तेव्हा मला त्यांना आठवण करून द्यावी लागते की मी जिल्ह्याचा खासदार आहे, असे म्हणत इम्तियाज यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला. कुठल्याही शहरांमध्ये स्मारक किंवा पुढाऱ्यांच्या पुतळ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा तिथे शाळा, रुग्णालये उभारली तर त्याचा फायदा गोरगरिंबाना होईल.

बरं ही स्मारकं, पुतळे सरकारी पैशातून बांधली जातात. कुठलाच नेता आपल्या खिशातून एक दमडीही देत नाही, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. पुतळा किंवा स्मारकाचा विषय आला की आधी आपण आपल्या खिशातून लाख दोन लाख देण्याचीी घोषणा करा, आणि मग समोरच्या नेत्यांना तुम्ही किती देणार हे विचारा, तो नेता पुन्हा पुतळ्याचे नाव काढत नाही. माझ्या मतदारसंघात मी असेच केले, असा किस्सा देखील इम्तियाज यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT