Latur District Sugar Factory News
Latur District Sugar Factory News Sarkarnama
मराठवाडा

Latur : कारखान्यावर ५० कोटींचे कर्ज ; शेतकऱ्यांनाही प्रतिटन दोनशे रुपये तोटा..

दिपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सर्वात जास्त उतारा देणारा साखर कारखाना म्हणून बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. (Latur) या कारखान्याची आज झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. (Sugar Factory) माजी चेअरमन दिनकर माने यांनी संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे कारखान्यावर ४० कोटीचे कर्ज झाल्याचा आरोप केला.

कर्जाच्या विषयावर मोठा आक्षेप घेत संचालक मंडळाने मोठा भ्रष्टाचार केल्याचं आरोप केला. तसेच साखरेचा उतारा कमी दाखवल्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन दोनशे रुपये नुकसान झाल्याचा दावा देखील माने यांनी केला. (Marathwada) माने यांच्या आरोपांमुळे सर्वसाधारण सभेत एकच खळबळ उडाली.

औसाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे पंधरा वर्षे चेअरमन होते. त्यांच्या काळात कारखान्यावर १० कोटी रुपयाचे कर्ज होते. दरम्यान मधल्या काळामध्ये सदरील साखर कारखाना बंद होता. गतवर्षी एकच हंगाम विद्यमान संचालक मंडळाने चालवला, यात विविध कारणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. त्यामुळे कारखान्यावरील कर्जाचा बोजा चाळीस कोटीवर गेला.

आजच्या सर्वसाधारण सभेमधील अहवालामध्ये मोलयासिसचे उत्पादन हे जास्त दाखवले, पण साखरेचा उतारा हा १०.४० पेक्षाही कमी दाखवल्याने शेतकऱ्यांचे प्रति टनाला दोनशे रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा देखील माने यांनी केला आहे. चेअरमन पदाचा कार्यकाळ संपत असताना कारखान्यावर दहा कोटी कर्ज होते आणि एक वर्ष हंगाम चालला त्यानंतर ४० कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा विद्यमान संचालक मंडळाने वाढविला.

आज एकूण कर्ज कारखान्यावरती पन्नास कोटी असल्याचे सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. यावर माने यांनी विद्यमान काँग्रेस प्रणित संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे किमान चार कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT