Mla Dhiraj Deshmukh, Latur
Mla Dhiraj Deshmukh, Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur : नुकसान जास्त, मदत कमी ; मुख्यमंत्री महोदय निर्णयाचा फेरविचार करा..

सरकारनामा ब्युरो

लातूर : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Latur) पण, राज्य सरकारकडून जाहीर झालेली मदत आणि शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष नुकसान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे (Farmers) शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरली असल्याने सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व भरीव मदत द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी केली.

लातूर ग्रामीणसह जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. (Marathwada) लातूर, रेणापूर, औसा तालुक्यात भेटी देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत धिरज देशमुख यांनी त्यांना धीर दिला होता. या नुकसानीकडे राज्य सरकारचे वेळोवेळी लक्षही वेधले. मुख्यमंत्र्यांना मदती संदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा देखील करण्यात आला.

अखेर याची दखल घेऊन शेतकऱ्यांना आज मदत जाहीर झाली. पण, लातूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसान आणि जाहीर झालेली मदत यात तफावत आहे. त्यामुळे सरकारने एकही नुकसानग्रस्त शेतकरी गोगलगायींच्या प्रादुर्भावाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली.

गोगलगायींच्या प्रादुर्भावाबरोबरच यंदा संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात २ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीपोटी २९० कोटींची मदत मिळणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. त्यास तात्काळ मंजुरी द्यावी. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT