Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

MVA News : लातूर जिल्ह्यात आघाडीत बिघाडी; औसा, निलंगा मतदारसंघावरून काँग्रेस, ठाकरे गटात रंगला वाद

Latur Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत लगीनघाई आतापासूनच सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप सुरु झाले आहे.

Sachin Waghmare

Latur News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत लगीनघाई आतापासूनच सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसापासून महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप सुरु झाले आहे. त्यामुळे एकमेकांच्या जागांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेषतः लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा या दोन मतदारसंघावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे कॉन्फिडन्स लोकसभेची निवडणूक जिंकल्यापासून चांगलेच वाढले आहे. त्यामुळे एकाच जागेवर दोन पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. औसा, निलंगा या दोन मतदारसंघावरून काँग्रेस (Congress), ठाकरे गटात वाद रंगला आहे. (MVA News)

औसा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कारण, औसा विधानसभेच्या जागेवर या अगोदर ठाकरे गटाच्या शिवसेने दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी औसा आणि निलंगा विधानसभेच्या जागेवरून एक सूचक विधान केले आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही जागेवरून आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात औसा आणि निलंगा येथे काँग्रेस पक्षाचा आमदार पाहिजे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे खलबते सुरू आहेत. आमची येथे पूर्वीचे आमदार होते त्यामुळे या दोन्ही जागा आम्हाला द्यावेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे मात्र आता काँग्रेसचे अमित देशमुख यांनी देखील औसा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. परंतु महाविकास आघाडीचे नेते आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत समन्वयाने निर्णय घेतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

औसा विधानसभेत काँग्रेसचा खूप दिवसापासून बालेकिल्ला राहिला आहे. सर्वाधिक निवडणुका काँग्रेसने याठिकाणी जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडेच ही जागा असली पाहिजे, अशी भूमिका मांडत अमित देशमुख यांनी या जागेवर काँग्रेसचा दावाच ठोकला. त्यामुळे अमित देशमुख यांच्या विधानाने सध्या महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला निलंगा अथवा औसा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT