VBA chief Prakash Ambedkar addressing a public meeting in Latur during Congress–Vanchit Bahujan Aghadi alliance campaign for the municipal elections. Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा दावा खरा ठरला... लातूरमध्ये काँग्रेस-वंचित एकत्र आले अन् भाजप दिसेनाच झाला!

Congress VBA Alliance : लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने प्रकाश आंबेडकरांनी 2014 मध्येच युती झाली असती तर भाजप दिसलेच नसते, अशी खंत व्यक्त केली.

Jagdish Pansare

Latur Municipal Election News : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी बारा वर्षापुर्वी म्हणजेच 2014 मध्ये झाली असती तर आज भाजप दिसले नसते, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास उशीर झाल्याची खंत व्यक्त केली होती. पण उशीरा का होईना आता आघाडी झाली आहे, आम्ही नक्कीच बदल घडवू, असा विश्वासही आंबेडकर यांनी व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी लातूर येथील सभेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेला हा दावा आता खरा ठरताना दिसत आहे.

लातूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते. 70 पैकी 65 जागा काँग्रेस पक्ष तर 5 जागा वंचित बहुजन आघाडीने लढवल्या होत्या. आता या आघाडीचा काँग्रेसला प्रचंड फायदा झाल्याचे दिसून येत आहे. 65 पैकी काँग्रेसने 43 तर वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला केवळ 22 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय संपादन करता आला आहे.

काय म्हणाले होते अमित देशमुख?

लातूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ, शहरातील राजश्री शाहू महाराज चौक परिसरात सभा झाली होती. यात राज्यात आणि केंद्रात भाजप व महायुती मधील इतर घटक पक्षांनी, विविध जाती धर्मात भांडणे लावून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. तोडा आणि फोडा प्रवृत्तीचा अवलंब करून ते आज सत्तेवर विराजमान झाले आहेत.

आजवर लातूरकरांनी या द्वेषाच्या राजकारणाला थारा दिला नाही, परंतु भाजपचे प्रयत्न थांबलेले नाहीत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला. खरे तर ही आघाडी म्हणजे या शहराचा आत्मा बनली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या आघाडीला हिरवा कंदील दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

ही आघाडी जिंकेलच पण काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा लातूर महानगरपालिका निवडणुकीतील विजय महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी नवी दिशा देईल, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला होता. आज अमित देशमुख आणि प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा खरा ठरताना दिसत आहे. 65 पैकी काँग्रेसने 43 तर वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT