Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar News, Nilanga Latur Sarkarnama
मराठवाडा

Latur News : जबरदस्तीच्या धर्मांतराचे लोण ग्रामीण भागात, आता शांत बसू नका..

राम काळगे

Marathwada : देशाच्या संस्कृती आणि धर्माला मोठी परंपरा आहे, मात्र या परंपरेला गालबोट लावण्याचे काम देशात काही विघातक शक्तीच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे. यामुळेच जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार देशासह राज्यात घडू लागले आहेत. हे लोण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहचू लागलेले असून आता जबरदस्तीने धर्मांतराविरोधात केवळ निवेदने नको तर वॉर्निंग देऊन हे प्रकार हाणून पाडावेत, असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केले.

लातूर (Latur) येथील युवा मेळाव्यात ते बोलत होते. संपुर्ण जगभरात हिंदू संस्कृतीला आणि धर्माला मोठी परंपरा लाभली आहे. या संस्कृती आणि धर्मांच्या परंपरेला प्रतिष्ठा मिळवून देत त्याला जोपासण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. (Bjp) मात्र देशात काही विघातक शक्तीच्या माध्यमातून भुलथापा आणि आमिष दाखवून जबदरस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार घडू लागलेले आहेत. हे प्रकार देशासह राज्याच्या विविध भागांमध्ये होत असून आता याचे लोण हळूहळू ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहचू लागले.

जबरदस्तीने होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्याचे काम होत असले तरी या घटना कमी होत नाहीत. त्यामुळेच आता केवळ निवेदन देऊन शांत बसण्याची वेळ नसून जबरदस्तीने धर्मांतर करणार्‍यांना वॉर्निंग देण्याची वेळ आली आहे. याकरीता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जबरदस्तीने होणारे धर्मांतराचे प्रकार हाणून पाडावेत.

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवा शक्तीने अधिक सक्रिय होऊन काम करणे अपेक्षीत असून युवा पिढीने समाजकारणासोबत राजकारणातही काम करत असताना सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहावे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातलेल्या असून आगामी मनपाच्या निवडणूकीत ३५ किंवा त्यापेक्षा कमी वयोगटात असणार्‍या तरुणांना ८० टक्के उमेदवारी देण्यात येईल, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

मात्र ही उमेदवारी मिळविण्यासाठी तरुणांनी केवळ नेत्यांच्या अवतीभोवती फिरण्याचे काम न करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना लोकहिताच्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी झटावे. आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेसह मनपावरही भाजपाचा झेंडा युवा शक्तीच्या माध्यमातून फडकविण्यात येईल, असा विश्वासही निलंगेकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT