MD Drugs Case Sarkarnama
मराठवाडा

Latur Drugs Case : 700 किलो गांजा, 21 किलो अफू अन् 96 ग्रॅम एमडी ड्रग्ज नष्ट; लातूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Latur Police Action : लातूर जिल्हा पोलीस दल अमली पदार्थांविरुद्ध अशीच कठोर मोहीम यापुढेही सुरू ठेवणार आहे. तब्बल 700 किलो गांजा, 21 किलो अफू अन् 96 ग्रॅम एमडी ड्रग्ज नष्ट करण्यात आले.

Jagdish Pansare

Marathwada Crime News : मराठवाड्यात अमली पदार्थांची विक्री आणि त्याच्या आहारी गेलेले तरूण असे चित्र गेल्या वर्षभरापासून दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी पोलीसांनी अनेक कारवाया केल्याचेही दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा लातूरमध्ये पोलीसांनी नशेखोरीविरोधात दंड थोपटत तब्बल सव्वा कोटी रुपयांचे अमली पदार्थ आगीत नष्ट केले.

लातूर जिल्ह्याला अमली पदार्थाच्या विळख्यातून नष्ट करण्यासाठी पोलीसांनी धडक मोहीम हाती घेतली होती. यातून 714 किलो गांजासह 1 कोटी 18 लाखांचे अमली पदार्थ जाळून खाक करण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वात आज मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध 45 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा आज कायदेशीररीत्या नष्ट करण्यात आला.

लातूर अतिरिक्त एमआयडीसीतील किर्ती आॅईल मिलमध्ये हा साठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केला. यात 713.9 किलो गांजा, 21.200 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रग्जचा समावेश आहे. न्यायालयीन आदेशानुसार आणि NDPS कायद्याच्या कलम 52 (अ) अन्वये, हा सर्व मुद्देमाल फायर बॉयलरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने जाळून पूर्णता नष्ट करण्यात आला.

या कारवाईनंतर लातूर जिल्हा पोलीस दल अमली पदार्थांविरुद्ध अशीच कठोर मोहीम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलीस अधिक्षक अमोल तांबे, मंगेश चव्हाण ,अपर पोलीस अधीक्षक, दत्तात्रय निकम प्रभारी पोलीस उपाधीक्षक, गृह, समाधान चवरे पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे, सदानंद भुजबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT