मराठवाडा

Latur Rural Assembly Election : धीरज देशमुख हे उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्त्व : डी.के. शिवकुमार

लातूर ग्रामीण ची जनता मतदान करून काँग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांना केवळ आमदार म्हणूनच निवडत नाहीये, तर महाराष्ट्राचे उद्याचे एक कर्तृत्वसंपन्न नेतृत्व निवडत आहे, असे गौरवोद्‌गार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काढले.

सरकारनामा ब्यूरो

लातूर : लातूर ग्रामीण ची जनता मतदान करून काँग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांना केवळ आमदार म्हणूनच निवडत नाहीये, तर महाराष्ट्राचे उद्याचे एक कर्तृत्वसंपन्न नेतृत्व निवडत आहे, असे गौरवोद्‌गार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काढले. लातूर तालुक्यातील मुरूड येथे लातूर ग्रामीण चे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार वसंत कुमार, विलास साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, रीड लातूर`च्या संस्थापिका दीपशिखा देशमुख, दिलीप नाडे, माजी आमदार त्र्यंबक भिसे आदींची यावेळी उपस्थिती होती. कर्नाटकमध्ये काँग्रेसने दिलेल्या पाच गॅरंटी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही लागू केल्या. प्रत्येक गृहिणीला महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, बेरोजगारांना चार हजार रुपये भत्ता, महिलांना मोफत बस योजना आम्ही सुरू केली. आमच्या योजना यशस्वीपणे कर्नाटकमध्ये सुरू आहेत.

तशाच त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुरू होतील, असे शिवकुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले. लाडक्या बहिणींना हा भाऊ `महालक्ष्मी बनवणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महालक्ष्मी योजनेअंतर्गत तमाम महिलांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. महायुतीने महिलांना १,५०० रुपये दिले. पण, महागाई इतकी वाढवून ठेवली आहे की फक्त तेलाच्या डब्यालाच २,२०० रुपये द्यावे लागत आहेत. महायुती सरकार एका हाताने तुटपुंजी मदत करून दुसऱ्या हाताने ती काढून घेत आहे.

अशा सरकारला घरी बसवण्याची वेळ आली आहे. महायुती सरकार लोकशाही, संविधान मानत नाही. अशा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. महिलांचे, तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत असण्याची गरज आहे, असे आवाहन धीरज देशमुख यांनी केले. शेतकरी, महिला, युवक व बेरोजगारांना सन्मान देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी धीरज देशमुख यांना साथ द्यावी. राज्यात महाविकास आघाडीच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील, असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT