Nanded News : विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी राज्यभरात सुरू आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे नांदेडमधील कंधारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
कंधार तालुक्यातील पाचोरा गावाजवळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या गाडी फोडण्यात आली आहे. ओबीसी उमेदवाराच्या प्रचाराला जात असताना 150 तरुणांनी आमच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोपही हाके यांनी केला आहे.
ओबीसी (OBC) आंदोलक लक्ष्मण हाके हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मराठवाड्यात आले होते. ते कंधार तालुक्यातील पाचोरा गावातून जात असतानाच त्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
हाके या घटनेनंतर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना पकडण्यात येत नाही , तोवर येथून हटणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे.
याबाबत आंदोलक लक्ष्मण हाके यांनी साम वृत्तवाहिनीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,आम्ही ओबीसी उमेदवाराच्या प्रचारार्थ येथे आलो असतानाच आमच्या गाडीवर तोंडावर पांढरे कपडे बांधून दीडशे तरुणांनी हल्ला केला. हा भ्याड हल्ला आहे.यावेळी हल्लेखोरांनी एक मराठा,लाख मराठा अशा घोषणा दिल्याचंही हाकेंनी म्हटलं आहे.
उद्या (ता.8) कंधार पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी या घटनेची नि: पक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत कंधार पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडणार असल्याचा इशाराही हाके यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.