Pawan Karvar attacked in Beed; political tension rises amid OBC reservation protests.  sarkarnama
मराठवाडा

Pawan Karvar Attack : बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या विश्वासू कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, 40 ते 50 आले अन्...

Laxman Hake Pawan Karvar Attack : 40 ते 50 जणांनी लक्ष्मण हाकेंचे समर्थक आणि ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Roshan More

Pawan Karvar News : मराठवाड्यात आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी पवन करवर यांच्यावर सावरगाव परिसरात मंगळवारी रात्री सुमारे 40 ते 50 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.

करवर व त्यांच्या तीन साथीदारांवर काठ्या, दांडके आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. यात करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने माजलगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या इतर तीन साथीदारांनाही मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हाकेंसाठी बनवले होते ढाल

काही आठवड्यांपूर्वी गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पवन करवर यांनी हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. याच करवर यांच्यावर हल्ला झाल्याने हाके यांनी संताप व्यक्त केला असून, हा भ्याड अन् जातीयवादी हल्ला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पवन हे आपल्या तीन साथीदारांसह एका हाॅटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. तेथे हाता काठ्या घेतलेला 40 ते 50 युवक आले. त्यांनी पवन यांना काठ्या आणि लाथबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. त्यामुळे पवन हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT