Laxman Hake Vs Manoj Jarange Patil sarkarnama
मराठवाडा

Laxman Hake: मी बॉण्ड पेपरवर लिहून देतो...मनोज जरांगे यांच्याबाबत लक्ष्मण हाके असे का म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर टीका केली आहे. "जरांगे यांची कमिटमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी आहे. मी बॉण्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, जरांगे पाटील एक सुद्धा उमेदवार उभा करणार नाही. ते निवडणूक लढणार नाहीत," असे लक्ष्मण हाके यांनी ठामपणे पत्रकार परिषदेत सांगितले.

हाके यांनी राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे हे शरद पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात. ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात. टोपे, तुम्ही एका जातीतचे काम करा, एका जातीच्या आंदोलनाला भेट देत रहा," असे सांगत हाके यांनी राजेश टोपे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यानंतर काल त्यांना कोणी गाड्या पुरवल्या, कोणी सपोर्ट केला? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला आहे. उपोषण सुटण्याच्या आदल्या रात्री राजेश टोपे भेटून जातात, दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात. आम्ही वास्तव बोलतोय. आम्ही उपोषणाला बसलो आणि जरांगेंचं उपोषण कोणत्याही शिष्टमंडळा शिवाय सुटलं. हे आमच्या आंदोलनाचे यश आहे," असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती,बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली. तिसऱ्या आघाडीवर त्यांनी टीका केली."हे तीनही नेते वात भिजलेले फटाके आहेत, बच्चू कडू यांच्यातील आंदोलक कधीच संपलेला आहे," असे ते म्हणाले.

जरांगे आणि संभाजीराजे यांच्यात पुतना मावशीचे प्रेम आहे. जरांगेंना स्वतःची गादी तयार करायची आहे, तर संभाजीराजे यांनी जरांगेंना मोठ करायचं नाही. दोन्ही नेते एकमेकांचे नेतृत्व करु शकत नाही. संभाजीराजे स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत.जरांगे यांना संभाजीराजेंना श्रेय द्यायचं नाही आणि संभाजीराजेंना देखील जरांगेंना मोठं करायचं नाही, असे हाके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT