eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Candidate Controversy : उमेदवारानेच हात पसरले; शिंदेंचा शिलेदार मतदारांकडे मागतोय पैसे; नेमकं प्रकरण काय? मतदारांना पैसेही मागतोय!

candidate asking money from voters controversy : महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ. शिंदे गटातील उमेदवाराने मतदारांकडे पैसे मागितल्याचा आरोप. नेमकं प्रकरण काय?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खा मटन, दाबा आमच्याच निशाणीचे बटन, कोणाचेही पैसे घ्या, पण मत आम्हालाच द्या, लक्ष्मीचे दर्शन होणार आहे, अशी विधानं राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहेत. 'पन्नास खोके, एकदम ओक्के' असा आरोप असलेल्या एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एक उमेदवार चक्क मतदारांना मत देण्याचे आवाहन करतांना पैसेही मागत असल्याचा गंमतीशीर प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिककेतील एका प्रभागातील या उमेदवाराने निवडणुका खूप महाग झाल्या आहेत. तो खर्च आपल्या परवडत नाहीये. तेव्हा प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी तुमचे आर्थिक पाठबळ हवे आहे, असे सांगत चक्क क्यू आर कोड आणि बँक खात्याचा क्रमांक सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. विशेष म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा उमेदवार आणि त्याची पत्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत गेला.

पक्ष प्रवेश केल्याचे बक्षिस म्हणून त्याला महापालिकेची उमेदवारीही देण्यात आली. हे पती-पत्नी माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेकडून दोनवेळा महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेता आणि पत्नी एकदा नगसेविका राहिली आहे. परंतु तरीही आपल्यावर अन्याय झाला म्हणत या पती-पत्नीने महिनाभरापुर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता उमेदवारी मिळाल्यांतर प्रिय मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो,

1988 पासून आजपर्यंत आपणासोबत आम्ही जोडले गेलो आहोत हे आमचे सौभाग्य!

सार्वजनिक जीवनात आज पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आचरणात आणून 80% आणि 20% समाजकारण या मार्गावर वाटचाल सुरु आहे भविष्यातही ती अशीच सुरू राहील .आपणा सर्वांच्या शुभेच्छा व शुभशिर्वादाच्या पाठबळावर आम्ही ही मनपा निवडणूक लढवत आहोत. प्रभाग मोठा असल्यामुळे प्रचारयंत्रणा राबवणे थोडे जास्तच खर्चिक झाले आहे त्यामुळे आम्हाला या कार्यात आपणाकडून यथाशक्ती आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. तरी आपण आपले योगदान आमच्या निवडणुकीसाठीच्या खात्यात पाठवून सहकार्य करावे, अशी विनंती या सुमित्रा आणि गिरजाराम हाळनोर या पती-पत्नीने केली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT